CLAT 2026 परीक्षा नक्की कधी आहे (फोटो सौजन्य - iStock)
CLAT चे पूर्ण रूप म्हणजे कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट. ही २४ राष्ट्रीय कायदा विद्यापीठांमध्ये (NLUs) पदवी (UG) आणि पदव्युत्तर (PG) कायदा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे आणि परीक्षा तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
CLAT २०२६ परीक्षा कधी होणार आणि ती कशी घेतली जाईल? असा प्रश्न अनेकांना असून त्याचे उत्तर म्हणजे CLAT २०२६ परीक्षा रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत घेतली जाईल. ही परीक्षा पेन-अँड-पेपर (ऑफलाइन) पद्धतीने घेतली जाईल, म्हणजेच तुम्हाला फक्त पेपर आणि पेननेच उत्तरे द्यावी लागतील. याबाबत अधिक प्रश्न आपण जाणून घेऊया.
SSC फेज – 13 भरती परीक्षा देणार 29 लाखापेक्षा अधिक उमेदवार, 24 जुलैपासून परिक्षेला सुरूवात
काय आहेत प्रश्न आणि उत्तरं
प्रश्न: CLAT २०२६ साठी अर्ज कधी सुरू होतील आणि किती काळासाठी असतील?
उत्तर: अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल आणि ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालेल. उमेदवारांना नोंदणी पूर्ण करण्यासाठी पूर्ण तीन महिने मिळतील.
प्रश्न: CLAT २०२६ ची संपूर्ण अधिसूचना कधी प्रसिद्ध होईल आणि त्यात कोणती माहिती असेल?
उत्तर: CLAT २०२६ ची अधिकृत अधिसूचना लवकरच CLAT वेबसाइटवर प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यात अभ्यासक्रम, परीक्षा नमुना, गुणांकन योजना, अर्ज शुल्क, पात्रता निकष आणि इतर महत्त्वाची माहिती समाविष्ट असेल.
प्रश्न: CLAT UG परीक्षेसाठी कोण अर्ज करू शकते?
उत्तर: बारावीत किमान ४५% गुण मिळवलेले उमेदवार CLAT UG परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. राखीव श्रेणीसाठी किमान ४०% गुण आवश्यक आहेत.
प्रश्न : CLAT PG परीक्षेसाठी पात्रता काय आहे?
उत्तर: CLAT PG साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान ४५% गुणांसह LLB पदवी असणे आवश्यक आहे. SC, ST आणि PwD (दिव्यांग) श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान ४०% गुण आवश्यक आहेत.
प्रश्न : गेल्या वर्षी CLAT साठी अर्ज शुल्क किती होते?
उत्तर: गेल्या वर्षी, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ४,००० रुपये होते, तर एससी, एसटी आणि बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) श्रेणीतील उमेदवारांसाठी ते ३,५०० रुपये होते.
प्रश्न : सीएलएटी परीक्षेबाबत काही वाद झाला आहे का?
उत्तर: हो, गेल्या वर्षी सीएलएटी २०२५ परीक्षा वादात अडकली होती. परीक्षा आणि अनेक न्यायालयीन खटल्यांनंतर, पदवी अभ्यासक्रमांसाठी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (सीएलएटी) चे निकाल सुधारित करण्यात आले आणि शनिवारी (१७ मे) जाहीर करण्यात आले.
CLAT 2026 Notification Direct Link