Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यापीठाच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता! ‘हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाईस’ची UK मध्ये अधिकृत नोंदणी

मुंबई विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या पोर्टेबल ‘हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाईस’ डिझाइनची युनायटेड किंगडममध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 19, 2025 | 05:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सात सदस्यीय संशोधन चमूने हे नाविन्यपूर्ण उपकरण विकसित केले
  • आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरणातील वर्ग २४ मध्ये समाविष्ट
  • आरोग्यसेवा अधिक सुरक्षित व प्रभावी करण्याची क्षमता या उपकरणात
मुंबई विद्यापीठाच्या आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण यश संपादन केले असून, विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या एका नाविन्यपूर्ण हेल्थकेअर डिझाइनची युनायटेड किंगडममध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. श्रीवरमंगई रामानुजम यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय संशोधन चमूने तयार केलेले हे पोर्टेबल ‘आरोग्य निरीक्षण उपकरण’ (Health Monitoring Device) आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या उपकरणाच्या संकल्पना, डिझाइन आणि विकास प्रक्रियेत संशोधन चमूतील सर्व सदस्यांनी समान योगदान दिले असून, हे संशोधन संघभावना आणि आंतरसंस्थात्मक समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

मुलाखतीत छाप सोडण्यासाठी ‘हे’ घ्या टिप्स! लगेच येईल कॉल, मिळेल जॉब

या डिझाइनचा समावेश आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरणातील वर्ग २४ मध्ये करण्यात आला असून, या वर्गात वैद्यकीय आणि प्रयोगशाळा उपकरणांचा समावेश होतो. हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, मेडिकल डिव्हाइसेस आणि अप्लाइड इंजिनिअरिंग या क्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आलेले हे उपकरण रुग्णसेवा अधिक प्रभावी, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आरोग्यसेवा क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, हे उपकरण आरोग्यसेवा वितरण प्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवते, असे मत डॉ. श्रीवरमंगई रामानुजम यांनी व्यक्त केले.

या हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाईसद्वारे रुग्णांच्या आरोग्यस्थितीवर सातत्याने आणि अचूकपणे लक्ष ठेवणे शक्य होणार असून, रुग्ण निरीक्षण, प्राथमिक निदान प्रक्रिया आणि उपचार व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनवण्यास यामुळे मदत होणार आहे. विशेषतः दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी तसेच वृद्ध आणि घरगुती उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हे उपकरण उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. या बहुविषयक संशोधन प्रकल्पात डॉ. नीलम शर्मा, अभिजित सुधाकर, डॉ. रवी शंकर पांडेय, डॉ. उपेंद्र कुमार, डॉ. राजीव रंजन राय आणि डॉ. नितीश पाठक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, विविध शैक्षणिक आणि तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन हे संशोधन पूर्ण केले आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये भरती! क्रेडिट ऑफिसर पदासाठी जागा रिकामे, करा अर्ज

आरोग्य निरीक्षण प्रणाली, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल हेल्थ उपाययोजना यांच्या माध्यमातून रुग्णसेवा अधिक सुलभ, विश्वासार्ह आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने हे संशोधन महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संशोधन क्षमतेचा आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला सन्मान विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून, भविष्यातील हेल्थकेअर संशोधनासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

Web Title: University research receives international recognition the health monitoring device is officially registered in the uk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Mumbai University
  • United Kingdom

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.