Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPMSP UP बोर्ड 10वी, 12वी निकाल 2025: ‘या’ तारखेला निकाल होणार जाहीर

UPMSP 10वी आणि 12वीचे निकाल एप्रिलअखेर जाहीर होण्याची शक्यता असून, मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अधिकृत निकाल upmsp.edu.in आणि upmspresults.nic.in या वेबसाइट्सवरच प्रसिद्ध केला जाईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2025 | 06:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषद (UPMSP) लवकरच 10वी आणि 12वीच्या परीक्षा निकालांची घोषणा करणार आहे. हा निकाल परिषदच्या अधिकृत वेबसाइट्स upmsp.edu.in आणि upmspresults.nic.in वर जाहीर केला जाईल. विद्यार्थी आपला रोल नंबर टाकून निकाल पाहू शकतील. 15 एप्रिलला दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होणार असल्याच्या बातम्या बनावट आहेत आणि राज्यात वारीच्या वेगाने प्रसिद्ध होत होते. मुळात, ही बातमी निव्वळ अफवा होती कारण निकालाची अधिकृत माहिती फक्त परिषदच्या अधिकृत संकेतस्थळावरच दिली जाईल. जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, निकाल 20 एप्रिलनंतर कधीही जाहीर केला जाऊ शकतो आणि एप्रिल अखेरीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाले असून, निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 69 पदांसाठी भरती सुरू; त्वरित करा अर्ज

गेल्या वर्षी, 20 एप्रिल 2024 रोजी 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाले होते. तेव्हा 10वीची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 89.55% होती, तर 12वीची टक्केवारी 82.60% होती. नेहमीप्रमाणे, या वर्षीही यूपी बोर्ड 10वी आणि 12वीचे निकाल पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करणार आहे. दोन्ही वर्गांचे निकाल एकत्र जाहीर केले जातात.

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाची (UP Board) 2025 ची बोर्ड परीक्षा 24 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 12 मार्च 2025 दरम्यान संपूर्ण राज्यात पार पडली होती. या परीक्षांसाठी राज्यभरात एकूण 8,140 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. येथे लाखो विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा दिली. परीक्षेनंतर लगेचच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनही सुरू करण्यात आले. 17 मार्चपासून मूल्यांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आणि राज्यभरातील 261 मूल्यांकन केंद्रांवर उत्तरपत्रिकांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.

नागपूरात शिक्षक भरती घोटाळा; मृत अधिकाऱ्याच्या सहीने 580 बनावट नियुक्त्या

बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन कोटी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन 19 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अत्यंत नियोजित आणि वेळेत पूर्ण करण्यात आल्यामुळे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी बोर्डाने आधीच शासनाकडे निकाल घोषित करण्यासाठी अधिकृत प्रस्ताव पाठवला असून, सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली जाईल.

Web Title: Upmsp up board 10th 12th results 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • hsc exam
  • HSC result
  • SSC results

संबंधित बातम्या

Nanded News : जिल्हाधिकाऱ्यांचे शैक्षणिक सफाई अभियान; कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन तासांची झाडाझडती
1

Nanded News : जिल्हाधिकाऱ्यांचे शैक्षणिक सफाई अभियान; कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन तासांची झाडाझडती

Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर
2

Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर

Nanded News : दहा दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन मातेने दिली परीक्षा; पीपल्स कॉलेजमध्ये हृदयस्पर्शी घटना
3

Nanded News : दहा दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन मातेने दिली परीक्षा; पीपल्स कॉलेजमध्ये हृदयस्पर्शी घटना

Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन
4

Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.