Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन; शैक्षणिक क्षेत्रात शोककळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांचे आज सकाळी निधन झाले. डॉ चौधरी यांना यकृताची समस्या असल्याने नागपूरमधील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

  • By नारायण परब
Updated On: Sep 26, 2024 | 12:06 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांचे आज दि. 26 सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ चौधरी यांना यकृताची समस्या असल्याने नागपूरमधील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या उपचारादरम्यानच आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते 59 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी x वर डॉ चौधरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. शैक्षणिक क्षेत्रात डॉ चौधरी यांचे भरीव योगदान राहिले आहे. मृदुभाषी आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात…

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 26, 2024

डॉ चौधरी हे यकृताच्या आजारावर काही महिन्यांपासून उपचार घेत होते. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी मुंबईला नेण्याचाही निर्णय घेतला होता मात्र एअर अॅम्बुलन्स न मिळाल्याने त्यांच्यावर नागपूरातील खासगी हॉस्पीटलमध्येच उपचार सुरु ठेवण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्यांच निधन झाले.

डॉ . सुभाष चौधरी यांचा परिचय

डॉ . सुभाष चौधरी यांचा जन्म 18 मे 1965 रोजी झाला. त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले तसेच त्यांनी पीचडी प्राप्त केली होती. डॉ. चौधरी यांना अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्राचा दांडगा अनुभव होता. 2020 मध्ये त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगूरपदी निवड झाली होती. नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर महोत्सवी सोहळा त्यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात झाला. त्यावेळी राष्ट्रपती उपराष्ट्रपतीपासून देशभरातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी त्यांच्या नेतृत्वात इंडियन सायन्स कॉंग्रेसचे आयोजन नागपूर विद्यापीठामध्ये करण्यात आले होते.

कुलगुरु पदावरुन निलंबन

डॉ चौधरी यांचे 21 फेब्रुवारी 2024 ला कुलपतींकडून निलंबन करण्यात आले होते. मात्र निलंबनाच्या कारवाईमध्ये कायदेशीर प्रक्रियेच पालन न केल्यामुळे त्यांचे निलंबन न्यायालयाने रद्द ठरविले. डॉ. चौधरींनी 11 एप्रिला पुन्हा कुलगुरु पदाचा कार्यभार स्वीकारला परंतु त्यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यानां कुलगुरु पदावरुन निलंबित करण्यात आले.

Web Title: Vice chancellor of nagpur university dr subhash chaudhary passed away mourning in education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 11:58 AM

Topics:  

  • Nagpur University
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन
1

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर
3

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच
4

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.