Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Traffic News: पुणे होणार ट्रॅफिकमुक्त! नितीन गडकरींकडून ४५ हजार कोटींच्या ६ महाप्रकल्पांची घोषणा

दुसरा प्रकल्प पुणे–सोलापूर मार्गावरील हडपसर ते यवत या ३१.५ किमी लांबीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा असून त्याची किंमत ५२६२ कोटी रुपये आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 06, 2026 | 04:26 PM
Pune Traffic Solution, 45000 Crore Projects, Nitin Gadkari Pune Projects,

Pune Traffic Solution, 45000 Crore Projects, Nitin Gadkari Pune Projects,

Follow Us
Follow Us:
  • पुणे-शिरूर ५३ किमी एलिव्हेटेड महामार्ग
  • खराडी-हडपसरमध्ये रस्ते, उड्डाणपूल आणि मेट्रोसाठी स्वतंत्र स्तरांचे नियोजन
  • १५ हजार कोटींचा नवा ‘ग्रीन हायवे’ पुणेकरांच्या सेवेत
Pune Traffic News: पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण लक्षात घेऊन शहराला जाममुक्त व प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या सहा महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांचे भूमिपूजन एका महिन्यात करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकल्पांसाठी राज्य सरकारने जीएसटी सवलत देणे, भूमी संपादनाचा खर्च उचलणे तसेच मुरूम व मातीवरील रॉयल्टी माफ करण्याची मागणी केंद्राकडून करण्यात आली असून उर्वरित निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.पुणे (Pune) ते शिरूर हा पहिला महत्त्वाचा एलिव्हेटेड महामार्ग प्रकल्प असून त्याची लांबी ५३ किमी आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ७५१५ कोटी रुपये आहे. खराडी ते विठ्ठलवाडी या ७.४ किमी भागात तीन स्तरांचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. पहिल्या स्तरावर चार लेन, दुसऱ्या स्तरावर सहा लेन आणि सर्वात वर मेट्रोसाठी मार्ग असे नियोजन करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी ते कोंढापुरी (२४.१४ किमी) या भागात ग्राउंड लेव्हलवर चार लेन आणि एलिव्हेटेड सहा लेनचा मार्ग असेल, तर कोंढापुरी ते शिरूर (२१.८५ किमी) या भागात सहा लेनचा रस्ता आणि दोन लेनचा फ्लायओव्हर असेल.

Pune-Mumbai Traffic Jam: पुणे-मुंबई ट्रॅफिक जामला कायमचा ‘ब्रेक’! १३५ किमीचा शिरूर-उरण मल्टिनोडल

दुसरा प्रकल्प पुणे–सोलापूर मार्गावरील हडपसर ते यवत या ३१.५ किमी लांबीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा असून त्याची किंमत ५२६२ कोटी रुपये आहे. हडपसर ते पुणे रिंगरोड दरम्यान तीन स्तरांचा मार्ग, तर पुढील भागात सहा लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे.

तिसरा प्रकल्प तळेगाव–चाकण–शिक्रापूर (एनएच ५४८डी) हा ५३.२० किमी लांबीचा असून त्याची किंमत सुमारे ४ हजार कोटी रुपये आहे. तळेगाव ते चाकण दरम्यान चार लेनचा रस्ता व त्यावर चार लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे.

पुणे ते संभाजीनगर द्रुतगती महामार्गाचाही आराखडा तयार झाला असून शिरूर ते संभाजीनगर हा १९२ किमी लांबीचा ‘ग्रीन हायवे’ सुमारे १५ हजार कोटी रुपयांत उभारला जाणार आहे. या मार्गामुळे पुणे ते संभाजीनगर प्रवास सुमारे सव्वा दोन तासांत पूर्ण होईल.

याशिवाय नाशिक फाटा ते खेड हा दहा लेनचा महामार्ग, नऱ्हे ते रावेत एलिव्हेटेड कॉरिडॉर, तसेच सातारा–कागल मार्गावरील विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. पुणे आणि नाशिक विभागात मिळून सुमारे १.१० लाख कोटी रुपयांची रस्ते विकास कामे मंजूर झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

PCMC Water Supply: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागणार कधी? १६७ एमएलडी अतिरिक्त पाण्यासाठी शहरवासीयांची प्रतीक्षा कायम

तसेच जेएनपीटी ते पुणे रिंगरोडदरम्यान नवीन पुणे–मुंबई महामार्ग उभारण्याचे काम सुरू असून पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर मार्गाची पाहणी करून पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

मुंबई गोवा हायवे चे उद्घाटन मी करणार नाही: गडकरी

मुंबई गोवा हायवे चे काम 95 टक्के पूर्ण झालेले आहे. परंतु या महामार्गाचे कामास विलंब लागल्यामुळे याचे उद्घाटन मी करणार नाही , सचिन गडकरी पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाल्यानंतर सर्वत्र हशा पिकला.

 

Web Title: Pune will be traffic free nitin gadkari announces 6 mega projects worth rs 45000 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Nitin Gadkari
  • Pune Traffic Issue

संबंधित बातम्या

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ‘या’ तीन मार्गांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार; गडकरी
1

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ‘या’ तीन मार्गांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार; गडकरी

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा
2

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.