
फोटो सौजन्य - Social Media
तर MCA हा २ वर्षाचा पोस्ट-ग्रॅज्युएट कोर्स आहे. दोन्ही कोर्स करण्यासाठी काही तरी पात्रता निकष पात्र असणे आवश्यक आहे. हे पात्रता निकष म्हणजे BCA साठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अनेक ठिकाणांवर अनेक ठिकाणी गणित/कंप्यूटर सायन्स आवश्यक आहे.
MCA करण्यासाठी आधी BCA / BSc / किंवा कोणतीही पदवी उर्त्तीर्ण करणे आवश्यक! महत्वाचे म्हणजे कधी कधी ग्रॅज्युएशनमध्ये गणित बंधनकारक आहे. दोघांचे अभ्यासक्रम जरी वेगवेगळे असले तरी अभ्यासक्रमाचा फोकस मात्र सारखाच आहे. एकंदरीत, BCA म्हणजे बेसिक IT फाउंडेशन! यामध्ये प्रोग्रामिंग, नेटवर्किंग, DBMS, वेब डेव्हलपमेंटसारखे विषय शिकवले जातात तर MCA हा एक अॅडव्हान्स्ड IT आणि स्पेशलायजेशन कोर्स आहे. यामध्ये आता नव्यानेच Add झालेला भविष्यातील सगळ्यात महत्वाचा विषय AI आहे तर यात डेटा स्ट्रक्चर, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, IT प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारखे विषयही शिकवले जातील.
जर BCA केलात तर फक्त एका मोठया IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डिझायनर, सिस्टम अॅनालिस्ट म्हणून काम करता येईल. तर MCA केलात तर एका मोठ्या कंपनीमध्ये सीनियर आणि मॅनेजेरियल रोल निभावता येईल. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, IT कन्सल्टंट, डेटा सायंटिस्ट या पदांचा समावेश आहे. BCA केलात तर बेसिक IT रोल्सनुसार सुरुवातीचा पगार मिळेल पण MCA केलात तर जास्त पगार आणि उच्च प्रोफाइल नोकऱ्या मिळतील. 12वी नंतर लगेच IT क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी BCA best! पण उच्च पदांसाठी, अॅडव्हान्स्ड स्किल्स आणि स्पेशलायजेशन हवे असल्यास MCA करा.