फोटो सौजन्य - Social Media
दुर्गम परीक्षा केंद्रे, वाहतुकीची गैरसोय
अनेक परीक्षा केंद्रे दुर्गम, गाठायला कठीण आणि वाहतुकीच्या दृष्टीने अयोग्य ठिकाणी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ परीक्षार्थी, महिला आणि दिव्यांग उमेदवारांना केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थी वाटेतच अडकले, किंबहुना परीक्षा वेळेत देणेही त्यांच्या अवघड झाले.
प्रशिक्षण नसलेले निरीक्षक; तक्रार निवारण यंत्रणा गायब
परीक्षेसाठी नेमण्यात आलेले निरीक्षक व कर्मचारी अपुऱ्या प्रशिक्षणप्राप्त असून पूर्णतः अनभिज्ञ असल्याचा गंभीर उल्लेख विद्यार्थ्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, तक्रार निवारण कक्ष किंवा कोणतीही तात्काळ कार्यवाही यंत्रणा अनेक केंद्रांवर पूर्णतः अनुपस्थित होती.
या सर्व त्रुटींमुळे अनेक परीक्षार्थ्यांना परीक्षेदरम्यान मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले, असे पत्रात नमूद आहे.
अनेक परीक्षा केंद्रांवर शौचालये बंद अथवा अस्वच्छ, पाण्याची व्यवस्था नसलेली, तसेच गोपनीयतेच्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे महिला परीक्षार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला, हे पत्रात स्पष्टपणे नमूद आहे. तसेच पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन सहाय्य यांसारख्या अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नव्हत्या. यामुळे परीक्षार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये अतिगर्दी, तुटकी आसने, अपुरा वायुवीजन (व्हेंटिलेशन) आणि बसण्याची निकृष्ट व्यवस्था असल्याच्याही तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. काही केंद्रांवर उष्णता आणि हवा न खेळल्यामुळे घुसमट निर्माण झाल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत:






