
फोटो सौजन्य - Social Media
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होत आहे, याची तपशीलवार माहिती विभागप्रमुखांकडून घेण्यात आली. यावेळी प्रत्येक विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील चालू योजनांची प्रगती, येणाऱ्या अडचणी तसेच आगामी कालावधीतील नियोजन सादर केले. प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे डॉ. सिंघल यांनी नमूद केले. नागरिककेंद्रित सेवा अधिक जलद आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने देण्यावर भर देत त्यांनी कामकाजात शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि पारदर्शकता या बाबींना विशेष महत्त्व देण्याचे आवाहन केले. बैठकीस जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, सहाय्यक परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य करताना सांगितले की, शासनाच्या सर्व योजना आणि उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून नागरिकांना वेळेत सेवा देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून विकासकामे ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकास प्रकल्प, मूलभूत सुविधा, पर्यावरण संरक्षण आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. या आढावा बैठकीमुळे प्रशासनातील कार्यपद्धती अधिक सक्षम होऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये गती आणि गुणवत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.