Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News :ब्रह्मीमध्ये महिलांचा ऐतिहासिक कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याच्या बाजूने स्पष्ट मत

वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मी येथे देशी-विदेशी दारूविक्री परवाना रद्द करण्यासाठी महिलांचे विशेष मतदान घेण्यात आले. ८१४ पैकी ५५३ महिलांनी मतदानात सहभाग घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 11, 2026 | 07:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मी (ता. वाशिम) येथे देशी व विदेशी दारूविक्रीच्या मंजूर अनुज्ञप्ती रद्द करण्यासाठी सोमवारी (दि. ९) महिलांचे विशेष मतदान घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. या मतदानात केवळ महिलांनाच मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. गावातील तरुणी, विवाहित तसेच ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला आणि दारूविक्री बंद करण्याच्या बाजूने ठाम कौल दिला. निकाल जाहीर होताच गावात महिलांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

ब्रह्मी गावात देशी व विदेशी दारूविक्रीचा परवाना देण्यात आला होता. संबंधित दुकान हे गावातील मुख्य रस्त्यावर तसेच बसस्थानकाजवळ असल्याने महिलांना, विशेषतः शाळकरी मुलींना ये-जा करताना अस्वस्थता जाणवत होती. काही वेळा दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींमुळे त्रास होण्याची शक्यता निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. गावातील महिलांनी पुढाकार घेत परवाना रद्द करण्याची ठाम मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांचा कौल जाणून घेण्यासाठी मतदान घेण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदान केंद्रावर शिस्तबद्ध वातावरणात प्रक्रिया पार पडली. सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. एकूण ८१४ महिला मतदारांपैकी ५५३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी तब्बल ५२३ महिलांनी दारूचे दुकान हटविण्याच्या बाजूने मत दिले, तर केवळ १४ महिलांनी दुकान कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान केले. १६ मते अवैध ठरली.

या मतदान प्रक्रियेसाठी तहसीलदार नीलेश पळसकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया पूर्ण केली. निकाल जाहीर होताच दारूविक्री परवाना रद्द करण्यासंदर्भात दारूबंदी विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

Dharashiv News: महायुतीच्या विजयानंतर राजकीय हालचालींना वेग; पालकमंत्र्यांची मुंबईत सदिच्छा भेट

महिलांनी दिलेला हा स्पष्ट आणि एकमुखी कौल लक्षात घेता प्रशासनाकडून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे गावात सुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता प्रशासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

Web Title: The historical voice of women in brahmi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Washim
  • Washim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.