फोटो सौजन्य - Social Media
खऱ्या आयुष्याची मज्जा तर शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरु होते. हीच ती वेळ असते, जेव्हा विद्यार्थी आपल्या करिअरविषयी खऱ्या अर्थाने जागृत होतात. यावेळीच विद्यार्थ्यामध्ये खऱ्या अर्थाने निर्णय क्षमता येते. या निर्णय क्षमतेच्या जोरावर विद्यार्थी असे निर्णय घेतात, ज्याने त्यांचे आयुष्य घडते. पण कधी कधी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्यासाठी विद्यार्थ्यांना संशोधन करावे लागते. ज्या क्षेत्रात आपले शिक्षण झाले आहे तेथे रोजगार शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
दरवर्षी वाणिज्य क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या क्षेत्रात प्रवेश घेतात. पण शिक्षण झाल्यानंतर अनेक जणांना प्रश्न पडते कि आता पुढे काय? जर तुम्ही ही वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थी आहात. तर हे लेख खास तुमच्यासाठीच आहे. या लेखात अशा करिअर ऑप्शन्सचा उल्लेख आहे, ज्यामध्ये वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थी त्यांचे पुढील आयुष्य घडवू शकतात.
चार्टड अकाउंटंट (CA)
भारतात वाणिज्य क्षत्रेतील विद्यार्थ्यांचे सगळ्यात आवडते पर्याय म्हणजे चार्टड अकाउंटंट होय. विशेष म्हणजे याला चांगल्या पगाराचे पदही म्हणता येईल. CA बनण्यासाठी इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICAI) ची परीक्षा पास करावी लागते. CA बनल्यावर व्यक्ती स्वतःची फर्मही सुरु करू शकतो.
कंपनी सेक्रेटरी (CS)
कंपनी सेक्रेटरी कंपनीच्या कार्यक्षम प्रशासनाची काळजी घेतो, ज्यामध्ये कायदेशीर आणि वैधानिक अनुपालन आणि प्रशासनाशी संबंधित समस्यांचा समावेश असतो. सीएस होण्यासाठी, उमेदवाराला बारावीच्या परीक्षेनंतर तीन स्तर पार करावे लागतात – फाउंडेशन प्रोग्राम, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्राम.
बँक पीओ
बँक प्रोबेशनरी ऑफिसर बँकमधील असे पद आहे जो जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असतो. ग्राहकांच्या समस्या जसे कि लोन किंवा कॅशमध्ये प्रॉब्लेम असल्यास त्यांना हॅन्डल करतो. या पदासाठी दरवर्षी अनेक वॅकन्सी निघत असतात.
कॉस्ट एंड मैनेजमेंट अकाउंटिंग (CMA)
आर्थिक दस्तवेजांची नियमित तपासणी करणे तसचे आर्थिक निर्णय घेताना महत्वाची भूमिका निभावणे अशा अनेक जबाबदाऱ्या कॉस्ट एंड मैनेजमेंट अकाउंटंटला पार पाडाव्या लागतात. CMA मध्ये करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यंने ICAI मध्ये नावनोंदणी करावी आणि CMA संबंधित कोर्स पूर्ण करावा लागेल.