
फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्रात अनेक नेतेमंडळी होऊन गेलेत त्यांचे राज्याच्या विकासासाठी फार मोठे योगदान आहे. त्यांची कार्यकर्तेमंडळी आणि त्या कार्यकर्त्यांच्या कित्येक पिढ्या त्यांच्या नेत्यांना अगदी देवासारखे पूजतात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ज्या नेत्याला अगदी देवासमान पुजता, ज्या नेत्याने फक्त महाराष्ट्रावर नाही तर येथल्या मनामनावरदेखील राज्य केले आहे. त्या नेत्याचे शिक्षण किती? चला तर मग जाणून घेऊयात.
बाळासाहेब ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उच्च शिक्षित नव्हते. बाळासाहेबांचे शिक्षण दहावी मॅट्रिक इतकेच होते परंतु त्यांचा कळ अनुभवावर जास्त होता. त्यांचा शैक्षणिक प्रवास हा राजकीय आणि व्यावसायिक प्रॅक्टिकल अनुभवात जास्त गुंतला.
शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करणारे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे पदवीधर होते. त्यांनी स्थानिक महाविद्यालयातून B.Com / अर्थशास्त्र किंवा व्यवसाय शाखेतून शिक्षण पूर्ण केले होते.
यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील राजकारणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव चव्हाण यांचे शिक्षण पुण्यातील ILS Law College येथे झाले. ते एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व होते.
गोपीनाथ मुंडे
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षणदेखील पुण्यातील ILS Law College येथे झाले. अगदी लहान वयातच त्यांनी समाजकारणामध्ये रस घेतला.
विलासराव देशमुख
विलासराव देशमुख हे अत्यंत सुशिक्षित नेते होते. त्यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.), कला शाखेतील पदवी (B.A.) तसेच कायद्याची पदवी (LL.B.) प्राप्त केली होती. त्यांचे B.Sc. आणि B.A. शिक्षण एम.ई.एस. आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे येथून झाले, तर LL.B. पदवी त्यांनी आय.एल.एस. लॉ कॉलेज, पुणे येथून पूर्ण केली होती.
प्रमोद महाजन
प्रमोद महाजन हे अत्यंत सुशिक्षित भारतीय राजकारणी होते. त्यांनी भौतिकशास्त्र, पत्रकारिता आणि राज्यशास्त्र या विषयांत उच्च शिक्षण घेतले होते. त्यांनी बीड येथील योगेश्वरी महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले, तर पुढील उच्च शिक्षणासाठी पुणे येथे अभ्यास केला. राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणूनही काम केले होते. शिक्षण, अध्यापनाचा अनुभव आणि अभ्यासू वृत्ती यांचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोठा प्रभाव दिसून येतो.
R.R. पाटील
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी आर्थिक अडचणींवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण घेत असताना त्यांनी अनेकदा “Earn & Learn” (कमवा आणि शिका) योजनेचा आधार घेतला. त्यांनी सांगली येथील शांतिनिकेतन कॉलेज येथून कला शाखेची पदवी (B.A.) आणि कायद्याची पदवी (LL.B.) प्राप्त केली. त्यांचे शिक्षणच पुढे त्यांच्या तळागाळातील, जनतेशी जोडलेल्या राजकीय प्रवासाची पायाभरणी ठरले.