Ajit Pawar Death: अजित पवारांचे शिक्षण किती? जाणून घ्या त्यांचं संपूर्ण राजकीय प्रवास
बुधवारी सकाळी आठ वाजता अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती येथे प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवासात अजित पवार यांच्यासह इतर सहा जणही विमानातून जात होते. मात्र, विमान बारामतीला पोहोचण्यापूर्वीच अपघातग्रस्त झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह इतर सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Ajit Pawar Death : टोमणे, चिमटे सरळ भाषेत सणसणीत वार; अजित पवारांचे गाजलेले डायलॉग्स
अजित पवारांचे शिक्षण
२२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला. त्यांच्या शिक्षणाबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी फक्त माध्यमिक शिक्षण (SSC) पूर्ण केले होते. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या अजित पवारांनी एकूण सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती.
अजित पवार यांची राजकीय कारकीर्द
पवार कुटुंबातील असल्यामुळे राजकारणात प्रवेश त्यांच्यासाठी तुलनेने सोपा होता, मात्र त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. १९८२ मध्ये त्यांनी साखर सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून सुमारे १६ वर्षे काम केले.
१९९१ नंतर ते अनेक वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांची लोकसभा सदस्य म्हणूनही निवड झाली होती. अजित पवार एकूण सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले असून, विविध सरकारांमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर काम केले.
अजित पवार हे कार्यक्षम, धोरणदृष्ट्या स्पष्ट आणि मेहनती नेतृत्वासाठी ओळखले जात होते. ते जनतेशी संवाद साधणारे आणि सरळ भाषेत आपले विचार मांडणारे नेते म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असून, सर्व पक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.






