Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Period Rules: शाळांमध्ये एक तास ‘४५ मिनिटांचाच’ का असतो? ‘या’ निर्णयामागचे वैज्ञानिक कारण वाचा एका क्लिकवर..

School Period Rules: शाळा सुरू झाल्यावर तास कधी संपणार, याकडे मुलांचे लक्ष का असते? ६० मिनिटांचा तास बदलून तो ४५ मिनिटांचा करण्याचा निर्णय पहिल्यांदा कधी आणि कुठे घेण्यात आला? कमी वेळेच्या पिरीयडमुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या यामागचा इतिहास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 21, 2026 | 11:55 AM
शाळा

शाळा

Follow Us
Follow Us:

School Period Rules: सामान्यतः शाळांमध्ये तास (पीरियड) सुरू होताच मुलांच्या मनात पहिला प्रश्न हाच येतो की, हा तास कधी संपणार. कधी कधी ४५ मिनिटांचा हा वेळ डोळ्यांची पाती लवते ना लवते तोच निघून जातो, तर कधी कधी तो खूप मोठा वाटू लागतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, बहुतांश शाळांमध्ये एक तास ४० ते ४५ मिनिटांचाच का असतो? चला तर मग जाणून घेऊया यामागचे नेमके कारण.

पूर्वी ६० मिनिटांचा असायचा एक तास

१९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत शाळांमध्ये एक तास सामान्यतः ६० मिनिटांचा असायचा. त्या काळात शिक्षण केवळ सकाळीच नाही, तर दुपारनंतरही चालत असे. मुलांना मधल्या वेळेत सुमारे तीन तासांची मोठा ब्रेक मिळायचा, ज्यामध्ये मुले घरी जाऊन जेवण करायची आणि पुन्हा शाळेत परतायची. तथापि, कालांतराने असे मानले जाऊ लागले की, जेवण केल्यानंतर मुलांची एकाग्रता कमी होते आणि उन्हाळ्यात अभ्यास करणेही कठीण होते. याच कारणामुळे शिक्षणतज्ज्ञांनी मुलांचा मानसिक थकवा आणि त्यांची शिकण्याची क्षमता यावर अभ्यास सुरू केला.

शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर झाला बदल

२० व्या शतकाच्या सुरुवातीला मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांनी अनेक प्रयोग केले. या संशोधनातून असे समोर आले की, सलग ६० मिनिटांपर्यंत अभ्यास करणे, मुलांसाठी थकवणारे ठरू शकते. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी असा सल्ला दिला की, लहान मुलांसाठी ३० मिनिटे आणि मोठ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ ते ५० मिनिटांचे वर्ग प्रभावी ठरतील. कमी वेळेच्या तासामध्ये मुले अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्याचा अभ्यासावर सकारात्मक परिणाम होतो, असे त्यांचे मत होते.

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..

१९११ मध्ये पहिल्यांदा लागू झाला ४५ मिनिटांचा नियम

२२ ऑगस्ट १९११ रोजी तत्कालीन प्रुशियाचे सांस्कृतिक मंत्री ऑगस्ट वॉन ट्रॉट जू सोल्ज यांनी एक आदेश जारी केला, त्यानुसार उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये एका तासाचा कालावधी ४५ मिनिटे असेल असे ठरवण्यात आले. हा निर्णय त्या काळातील शिक्षणतज्ज्ञांच्या शिफारसींवर आधारित होता.

४५ मिनिटांचा तास लागू झाल्यानंतर,या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. अनेक शिक्षकांचे असे मत होते की, ४५ मिनिटांचा वेळ अभ्यासासाठी पुरेसा नाही. इतक्या कमी वेळेत एखादा विषय सविस्तरपणे समजावून सांगणे कठीण होईल आणि शिक्षण केवळ घाईघाईने अभ्यासक्रम संपवण्यापुरते मर्यादित राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Rahul Gandhi Education: राहुल गांधी किती शिकलेत? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…

हळूहळू जगभरात लोकप्रिय झाले हे मॉडेल

विरोधानंतरही ४५ मिनिटांचे हे मॉडेल यशस्वी ठरले आणि हळूहळू जर्मनीच्या इतर भागांतही लागू करण्यात आले. पुढे अनेक देशांनी ही व्यवस्था स्वीकारली. आजही जर्मनी, इंग्लंड, ब्रिटन आणि पोलंड यांसारख्या देशांमध्ये ४५ मिनिटांच्या आसपासचे तास असणे सामान्य आहे.

Web Title: Why school period rules 45 minutes history scientific reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Marathi School
  • period
  • reason
  • Rule
  • scientific approach

संबंधित बातम्या

Vasai Tatli Andolan : ‘ताटली’ आंदोलनाला यश! शासनाने घेतली दखल; जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू
1

Vasai Tatli Andolan : ‘ताटली’ आंदोलनाला यश! शासनाने घेतली दखल; जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य
2

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.