Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवा महाविद्यालयात ‘स्त्रियांची शतपत्रे’ कार्यक्रमाचे आयोजन; अभिवाचनातून ऐकू आले ऐतिहासिक महिला विचार

महिला दिनानिमित्त विवा महाविद्यालयात आयोजित 'स्त्रियांची शतपत्रे' कार्यक्रमात 19 व्या आणि 20 व्या शतकातील महिलांनी लिहिलेल्या पत्रांचे अभिवाचन करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 10, 2025 | 05:47 PM
विवा महाविद्यालयात ‘स्त्रियांची शतपत्रे’ कार्यक्रमाचे आयोजन; अभिवाचनातून ऐकू आले ऐतिहासिक महिला विचार
Follow Us
Follow Us:

महिला दिनाच्या निमित्ताने विवा महाविद्यालयात विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, महिला सक्षमीकरण कक्ष आणि यंग स्टार ट्रस्ट, आगाशी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्रियांची शतपत्रे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. स्वाती कर्वे यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वीच्या मासिके आणि वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या महिलांच्या पत्रांचे संकलन करून ग्रंथ स्वरूपात प्रसिद्ध केले आहे. या ग्रंथातील निवडक पत्रांचे अभिवाचन या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्राच्या अभिवाचनाने झाली.

आयआयएम नागपूरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प; नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल

त्या काळातील स्त्री शिक्षणाची तळमळ आणि समाजप्रबोधनाचे प्रतिबिंब या पत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. या अभिवाचनात दीपाली शहाणे, नेहा किणी, जान्हवी दरेकर, नमिता तेंडुलकर आणि सागर रानडे यांनी सहभाग घेतला. त्यांनी पत्रांतील विचार, भावना आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती यांचा प्रभावी आविष्कार श्रोत्यांसमोर सादर केला.

या अभिवाचनातून 19 व्या आणि 20 व्या शतकात महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलांचे विविध विषयांवरील विचार ऐकायला मिळाले. त्या काळातील समाजव्यवस्थेच्या अनुषंगाने महिलांची रोखठोक भाषा, मुद्देसूद मांडणी आणि स्त्री-पुरुष समतेचा प्रगल्भ विचार यांचे दर्शन श्रोत्यांना या कार्यक्रमातून घडले. कार्यक्रमात वाचल्या गेलेल्या पत्रांमध्ये स्त्री शिक्षण, वर्णभेद, आंतरजातीय विवाह, पुनर्विवाह, विधवा स्त्रियांचे पुनर्वसन, प्रापंचिक कामाचा मोबदला पत्नीला मिळावा अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. या पत्रांमधून महिलांच्या विचारसरणीचा प्रवास आणि शिक्षण हेच स्त्री सक्षमीकरणाचे मुख्य साधन आहे, हे अधोरेखित झाले.

ICG भरतीच्या अर्जदारांसाठी महत्वाची बातमी! करेक्शन विंडो खुली; अर्ज तपासून घ्या

कार्यक्रमाची संकल्पना दिग्दर्शक विलास पगारे यांची होती, तर निर्मिती प्रमुख देवेंद्र प्रभूदेसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सागर रानडे यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला वेगळेच वजन प्राप्त झाले. या समृद्ध अभिवाचनातून श्रोत्यांना प्रगल्भ आणि ऐतिहासिक दृष्टिकोन देणारा अनुभव मिळाला. कार्यक्रमासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. श. अडिगल, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा, महिला सक्षमीकरण कक्ष समिती प्रमुख डॉ. प्राक्तना कोरे यांचे मोलाचे सहाय्य लाभले. कार्यक्रमाची सांगता प्राध्यापिका हर्षवर्धिनी बोरणकर यांनी आभार प्रदर्शनाने केली. ‘स्त्रियांची शतपत्रे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ऐतिहासिक महिला विचारांची उजळणी करता आली आणि महिलांच्या संघर्षमय प्रवासाला नवा दृष्टिकोन मिळाला.

Web Title: Womens centenary program organized at viva college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 05:47 PM

Topics:  

  • Educational News

संबंधित बातम्या

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर
1

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस
2

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.