Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Teachers Day 2026: जगभरात तब्बल ४.४ कोटी अतिरिक्त शिक्षकांची गरज भासणार; युनेस्कोचा मोठा इशारा!

World Teachers Day 2026: यंदाचा जागतिक शिक्षक दिन २०२६ अधिक खास आहे, कारण १९६६ मध्ये शिक्षकांच्या स्थितीबाबत तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय शिफारशींना या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 05, 2026 | 03:29 PM
teacher

teacher

Follow Us
Follow Us:

World Teachers Day 2026: दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक शिक्षक दिन’ साजरा केला जातो. हा दिवस केवळ शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्याचा नाही, तर शिक्षक ज्या कठीण परिस्थितीत काम करतात आणि शिक्षण व्यवस्था त्यांना किती व्यावसायिक व आर्थिक सहकार्य पुरवत आहे, यावर लक्ष वेधण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. यंदाचा जागतिक शिक्षक दिन २०२६ अधिक खास आहे, कारण १९६६ मध्ये शिक्षकांच्या स्थितीबाबत तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय शिफारशींना या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच, युनेस्कोने (UNESCO) एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे की, २०३० पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा सार्वभौमिक उद्देश साध्य करण्यासाठी जगाला तब्बल ४.४ कोटी अतिरिक्त शिक्षकांची गरज भासणार आहे.

जागतिक शिक्षक दिन ५ ऑक्टोबरला का साजरा केला जातो?

५ ऑक्टोबर १९६६ रोजी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (ILO) यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष आंतरराष्ट्रीय परिषदेत शिक्षकांच्या स्थितीविषयी एक महत्त्वाची शिफारस स्वीकारण्यात आली होती. यामध्ये शिक्षकांचे हक्क, जबाबदाऱ्या, त्यांची पूर्वतयारी, भरती, रोजगार आणि अध्यापनाच्या परिस्थितीशी संबंधित आंतरराष्ट्रीय मानक निश्चित करण्यात आले होते. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ १९९४ पासून दरवर्षी ५ ऑक्टोबरला हा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

वर्ष २०२६ च्या शिक्षक दिनाची थीम आणि महत्त्व:

या वर्षीच्या जागतिक शिक्षक दिनाची युनेस्कोने ठरवलेली थीम “Standing with teachers: 60 years of protecting the profession, advancing its status and shaping our futures” ही आहे. या थीमचा उद्देश केवळ शिक्षकांना धन्यवाद देणे हा नसून, शिक्षण प्रणाली शिक्षकांना आपले काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यावसायिक आणि आर्थिक सहकार्य देत आहे का, हा कळीचा सवाल उपस्थित करणे हा आहे.

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया

शिक्षकांसमोरील बदलत्या आव्हानांची समीक्षा:

गेल्या सहा दशकांमध्ये शिक्षण आणि समाजात मोठे बदल झाले आहेत. आजच्या डिजिटल युगात शिक्षकांसमोर डिजिटल तंत्रज्ञान, हवामान बदल, स्थलांतर आणि विस्थापन यांसारख्या नवीन आव्हानांची भर पडली आहे. याशिवाय, शिक्षकांची स्वायत्तता, धोरण निर्मिती प्रक्रियेतील सहभाग, वेतन, कामाचा वाढता ताण आणि कामाचे वातावरण हे महत्त्वाचे मुद्दे बनले आहेत. त्यामुळे, बदलत्या परिस्थितीनुसार आंतरराष्ट्रीय मानकांमध्ये सुसंगतता आणण्यासाठी सध्याच्या काळात या शिफारसींची पुनर्रचना व समीक्षा केली जात आहे.

२०३० पर्यंत ४.४ कोटी शिक्षकांची गरज:

युनेस्कोच्या अहवालानुसार, २०२३ ते २०३० या कालावधीत शिक्षण क्षेत्रासमोर केवळ नवीन शिक्षकांची भरती करण्याचेच आव्हान नाही, तर सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना पेशात टिकवून ठेवणे आणि त्यांना उत्तम कामाची परिस्थिती व योग्य सहकार्य देणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..

जागतिक सोहळा :

या वर्षीच्या जागतिक शिक्षक दिन २०२६ चा मुख्य जागतिक सोहळा ५ ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे मुख्यालय, पेरिस (फ्रान्स) येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जगभरातून आलेले शिक्षक, शिक्षण मंत्री आणि शिक्षण क्षेत्रातील इतर मान्यवर सहभागी होऊन शिक्षकांचे हक्क, कामाची परिस्थिती आणि बदलत्या शिक्षण प्रणालीतील त्यांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करत आहेत.

Web Title: World teachers day 2026 5 october history significance sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Happy Teacher's Day
  • Teacher Recruitment

संबंधित बातम्या

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..
1

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.