Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vacant Teacher Posts : सरकारी शाळांमध्ये शिक्षकांचा मोठा तुटवडा! देशभरात ३.५७ लाख पदे रिक्त; उत्तर प्रदेश आघाडीवर

Vacant Teacher Posts : देशभरातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता असून तब्बल ३ लाख ५७ हजार ८६२ मंजूर पदे रिक्त आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक १ लाख ९३ हजार ८६२ पदे रिक्त आहेत. दुसरीकडे, बिहारमध्ये एका वर्षात एकशिक्षकी शाळांची संख्या १७ हजार ३५९ वरून १ हजार ८६५ पर्यंत कमी झाली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 13, 2026 | 09:44 PM
Government School Teacher Vacancies ( सरकारी शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा ) फोटो सौजन्य AI

Government School Teacher Vacancies ( सरकारी शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशात सर्वाधिक शिक्षकांची पदे रिक्त 
  • बिहारमध्ये एकशिक्षकी शाळांच्या संख्येत घट 
  • विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळणे कठीण झाले  
Vacant Teacher Posts : देशातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता असल्याचे सांगितले जात आहे. ३.५७ लाख पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होताना दिसत आहे. तर देशातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता ही गंभीर समस्या बनली आहे. ग्रामीण भागांतील शाळांमध्ये एकाच शिक्षकाला चार ते पाच वर्ग सांभाळावे लागत आहेत. याचे हे भयान वास्तव समोर आले. विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळण्यात अडचणी येत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही सुध्दा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल ३ लाख ५७ हजार ८६२ मंजूर पदे अद्याप रिक्त आहेत.

शिक्षण मंत्रालयाला १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सादर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली. यापैकी सुमारे २ लाख ९७ हजार ५० पदे प्राथमिक स्तरावरील आहे. प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा पाया मानला जातो. पण मात्र, याच स्तरावर शिक्षकांची कमतरता असल्याचे दिसत आहे. यामुळे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक शिक्षकांची पदे रिक्त

शिक्षकांच्या रिक्त पदांच्या बाबतीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. राज्यात सुमारे १ लाख ९३ हजार ८६२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. हा आकडा देशभरातील नोंदवलेल्या रिक्त पदांच्या निम्म्याहून अधिक आहे. याशिवाय मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमध्येही शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत.

राष्ट्रीय स्तरावर प्राथमिक शिक्षणातील विद्यार्थी-शिक्षक प्रमाण सरासरी २४:१ पर्यंत सुधारल्याचे आकडेवारीत दिसते. मात्र, ही सरासरी ग्रामीण आणि दुर्गम भागांतील शाळांची वास्तविक परिस्थिती स्पष्ट करत नाही. अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकाला वेगवेगळ्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवावे लागत आहे.

बिहारमध्ये एकशिक्षकी शाळांच्या संख्येत घट

दरम्यान, बिहारने शिक्षकांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. राज्यातील एकशिक्षकी शाळांची संख्या एका वर्षात १७ हजार ३५९ वरून १ हजार ८६५ पर्यंत खाली आली आहे. म्हणजेच जवळपास ८९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. दुसरीकडे, झारखंडमध्ये एकशिक्षकी शाळांची संख्या जवळपास पाचपट, तर पश्चिम बंगालमध्ये जवळपास तिप्पट झाल्याचे समोर आले आहे.

ICAR Recruitment 2026: ICAR मध्ये बंपर भरती! 1393 पदांची भरती, मुलाखत न देता मिळणार नोकरी

विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळणे कठीण झाले

एका शिक्षकाला अनेक वर्ग सांभाळावे लागत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतंत्र लक्ष देणे शक्य होत नाही. विशेषतः वाचन, लेखन आणि गणितात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन मिळण्यात अडचणी येतात. याचा परिणाम त्यांच्या मूलभूत शिक्षणावर होऊ शकतो.

त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि प्रत्येक वर्गासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. केवळ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवून शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य शिक्षक आणि वैयक्तिक मार्गदर्शन मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्थानिक पातळीवरही शाळांमधील मंजूर आणि रिक्त शिक्षक पदांची माहिती जाणून घेण्याची गरज आहे.

Sinhgad Colleges News: पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा निर्णय! सिंहगड संस्थवर ३ वर्षांसाठी प्रशासक नियुक्त

Web Title: India government schools 3 57 lakh teacher vacancies up bihar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • Education Department
  • Teacher Job
  • Teacher Recruitment

संबंधित बातम्या

Education News: परदेशातील उच्च शिक्षणाला ‘ब्रेक’! २०२३ मधील ९.०८ लाखांवरून संख्या थेट ६.२६ लाखांवर
1

Education News: परदेशातील उच्च शिक्षणाला ‘ब्रेक’! २०२३ मधील ९.०८ लाखांवरून संख्या थेट ६.२६ लाखांवर

शिक्षकांचे वेतन थकले, शिकवणी बंद पडली; सिंहगडच्या १३ शाळांबाबत न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय
2

शिक्षकांचे वेतन थकले, शिकवणी बंद पडली; सिंहगडच्या १३ शाळांबाबत न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.