फोटो सौजन्य- सोशल मीडिया
How to Become an Army Doctor in India: जास्तीत जास्त तरुण देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहतात. परंतु, भारतीय सैन्यात डॉक्टर म्हणून देशरक्षण करणाऱ्या वीर जवानांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी जेव्हा येते, तेव्हा मान आणि अभिमान अनेक पटींनी वाढतो. सरहद्दीवर तैनात असलेले सैनिक अहोरात्र देशाचे रक्षण करतात, तर त्यांच्या आरोग्याची आणि प्राथमिक उपचारांची जबाबदारी ‘आर्मी मेडिकल सर्व्हिस’ (AFMS) यांच्याकडे असते.
सैन्यात डॉक्टर होणे ही कोणतीही सर्वसाधारण नोकरी नसून, तो एक असा जज्बा आहे, जिथे ‘डॉक्टर’ असण्यासोबतच ‘सैनिक’ असण्याचाही गौरव प्राप्त होतो. जर तुम्हाला वैद्यकीय शिक्षणासोबतच सैन्याचा गणवेश परिधान करायची इच्छा असेल, तर हा मार्ग अत्यंत उत्तम आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की आर्मीमध्ये डॉक्टर बनण्यासाठी कोणती पात्रता लागते? चला तर मग जाणून घेऊया.
आर्मीमध्ये डॉक्टर बनण्यासाठी उमेदवाराकडे १२ वी परीक्षा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांसह कमीत कमी ६० टक्क्यांसाह उत्तीर्ण असणे गरजेचे असते. तसेच त्याने नीट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सैन्यात डॉक्टर होण्यासाठी आर्मी मेडिकल कॉलेज, पुणे (AFMC) या प्रमुख केंद्रात प्रवेश हा नीट स्कोरच्या आधारावर मिळते. शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, मुलाखत आणि वैद्यकीय फिटनेस टेस्ट मधून जावे लागते.
विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! CUET UG परीक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल; उमेदवारांचा वेळही वाचणार
एएफएमसी किंवा इतर मिलिट्री हॉस्पिटलशी संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर एमबीबीएसच्या अभ्यासासोबतच सैन्याचे नियम आणि शिस्तीचे धडे दिले जातात. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दल, नौदल किंवा वायुसेनेत थेट ‘लेफ्टिनेंट’ किंवा ‘कॅप्टन’ पदावर कमिशन दिले जाते. पात्र उमेदवारांची नियुक्ती देशभरातील मिलिट्री हॉस्पिटल, फील्ड युनिट्स, कमांड हॉस्पिटल्स किंवा युद्धभूमीवरील मेडिकल पोस्टवर केली जाते. सैन्यात ‘कॅप्टन’ पदावरून सुरुवात झाल्यानंतर ७ व्या वेतन आयोगानुसार बेसिक सैलरी, मिलिट्री सर्विस पे आणि इतर भत्ते मिळून सुरुवातीची मासिक कमाई १ लाख रुपयांपेक्षा बरीच जास्त असते.
यासोबतच त्यांना, इतर फौजी अधिकाऱ्यांप्रमाणेच मोफत राहण्याची सोय, राशन, मेडिकल क्लेम, कॅंटीन कार्ड, मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम शाळा आणि प्रमोशनची संधी मिळते.
सैन्यात डॉक्टरची निवृत्तीची वयोमर्यादा त्यांची रँक आणि स्पेशलायझेशननुसार साधारणपणे ५८ ते ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकते. निवृत्तीनंतर केंद्र सरकारच्या नियमांनुसार पेन्शन, आयुष्यभर मोफत वैद्यकीय सुविधा आणि माजी सैनिकांचे सर्व लाभ मिळतात. याशिवाय समाजात मिळणारा सर्वोच्च सन्मान हा या पेशाला सर्वात खास बनवतो.






