
ca world book
Youngest CA : सामान्यतः १६ व्या वयात मुले १० वी किंवा १२ वीचे शिक्षण आणि करिअरच्या पर्यायांबाबत संभ्रमात असतात. मात्र, लक्ष्मणन मय्यप्पन यांनी याच वयात प्रोफेशनल अकाउंटिंगचे शिक्षण पूर्ण करून जगाला थक्क केले आहे. दुबईत राहणाऱ्या लक्ष्मणन मय्यप्पन यांना अवघ्या १६ वर्षे आणि १४१ दिवस वयात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ‘जगातील सर्वात तरुण पुरुष चार्टर्ड अकाउंटंट’ म्हणून घोषित केले आहे.
लक्ष्मणन मय्यप्पन यांचा फायनान्सच्या दुनियेतील प्रवास कोरोना महामारीच्या काळात सुरू झाला होता. त्याच काळात त्यांनी १० वीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली होती. अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी ACCA चे शिक्षण सुरू केले आणि साधारण १ वर्षात ते पूर्ण केले. आज ते केवळ CFA ची पात्रता मिळवून थांबले नाहीत, तर दुबईतील एका प्रतिष्ठित कंपनीत सीनियर रिसर्च अनालिस्ट म्हणून कामही करत आहेत. जाणून घ्या लक्ष्मणन मय्यप्पन यांच्या या ऐतिहासिक प्रवासाची संपूर्ण गोष्ट…
लक्ष्मणन यांची फायनान्स मधील रुची महामारीच्या काळात निर्माण झाली. त्यांची आई स्वतः क्वॉलिफाइड ACCA आहेत. लॉकडाउनच्या रिकाम्या वेळेत त्यांच्या आईने त्यांना अकाउंटिंगचे बेसिक कॉन्सेप्ट्स समजावून सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर लक्ष्मणन यांना या क्षेत्रात इतकी आवड निर्माण झाली की, त्यांनी स्वतः ही प्रोफेशनल क्वालिफिकेशन मिळवण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत कमी वेळेत ती परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली.
गिनीज रेकॉर्ड बनवल्यानंतरही लक्ष्मणन मय्यप्पन यांचा शैक्षणिक प्रवास थांबलेला नाही. ACCA पूर्ण केल्यानंतर त्यांनी CFA (चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट) ची पात्रता प्राप्त केली. सध्या लक्ष्मणन फायनान्समध्ये एमएससी करत आहेत. यासोबतच ते दुबईच्या ‘सेंचुरी फायनान्शियल’ कंपनीत सीनियर रिसर्च अनालिस्ट पदावर कामही करत आहेत. ते फायनान्शियल मार्केटमधील इन्व्हेस्टमेंट आणि रिसर्चशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतात.
आपल्या या ऐतिहासिक यशाबद्दल बोलताना लक्ष्मणन मय्यप्पन म्हणाले- “माझ्यासाठी हे स्थान खूप महत्त्वाचे आहे. पण मी कधीही अभ्यासाकडे एका शर्यतीसारखे पाहिले नाही. माझ्यासाठी हे समजणे जास्त महत्त्वाचे होते की, खऱ्या दुगुनेत फायनान्स कसा काम करतो. जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट घाईघाईने शिकण्याऐवजी उत्सुकतेने शिकता, तेव्हा त्याचे परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात.”
AI Proof Courses: एआयमुळे नोकरी जाण्याची भीती वाटतेय? मग हे ५ कोर्सेस बदलतील तुमचे करिअर!
अभ्यास आणि फायनान्सच्या गुंतागुंतीच्या दुनियेपासून वेगळा असा लक्ष्मणन यांचा एक क्रिएटिव्ह पैलूही आहे. आपल्या रिकाम्या वेळेत त्यांना घड्याळे डिझाईन करायला आणि ती बनवायला खूप आवडतात. त्यांचा हा अनोखा प्रवास इतर विद्यार्थ्यांना हे दाखवून देतो की, केवळ एखाद्या पदवीवर अवलंबून न राहता शाळेनंतर लगेचच जगमान्य पात्रतेच्या माध्यमातून फायनान्समध्ये मोठे करिअर घडवता येऊ शकते.