फोटो सौजन्य- सोशल मीडिया
College Ragging : कोणत्याही स्टूडेंटसाठी कॉलेज लाईफमध्ये एंट्री करणे एका नवीन आणि रोमांचक प्रवासाची सुरुवात असते. नवीन मित्र, नवीन वातावरण आणि नवीन आशा या प्रवासाला खास बनवतात. पण अनेकदा सीनियर आणि जुनियरच्या ओळखीच्या किंवा ‘इंट्रोडक्शन’च्या नावाखाली काही अशा घटना घडतात, ज्या मनामध्ये भीती निर्माण करतात. अशा वेळी नवीन स्टुडंट्सच्या मनात वारंवार हा प्रश्न उपस्थित होतो की, सीनियर्ससोबतची सामान्य बातचीत आणि रॅगिंगमधील सीमारेषा नेमकी कुठे संपते?
अनेकदा स्टुडंट्स असा समज करून घेतात की, जोपर्यंत कोणतीही शारीरिक मारहाण किंवा गंभीर वाद होत नाही, तोपर्यंत ती रॅगिंग नसते. पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. एखाद्या फ्रेशर किंवा फर्स्ट इयरच्या स्टुडंटला मानसिक त्रास देणे, अपमानित करणे किंवा त्याच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करायला लावून घेणे हे रॅगिंगच्या कक्षेत येते. यामध्ये बळजबरीने किंवा विचित्र पद्धतीने नमस्कार करायला लावणे इत्यादी बाबींचाही समावेश होतो. तुमच्यासोबत रॅगिंग होत आहे की नाही आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय केले पाहिजे, हे समजून घेण्यासाठी UGC चे नियम माहीत असणे गरजेचे आहे.
रॅगिंग रोखण्यासाठी युजीसीने अनेक नियम बनवले आहेत. या परिस्थितीत एफआयआर (FIR) दाखल करण्याचीही तरतूद आहे. पण तरीही रॅगिंगच्या घटनांमध्ये घट झालेली नाही. रॅगिंगमध्ये कशाचा समावेश होतो, ते जाणून घ्या:
१. मानसिक त्रास आणि अपमान करणे
३. शारीरिक त्रास देणे किंवा बळजबरी करणे
जर तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर तो मुकाटपणे सहन करण्याऐवजी तात्काळ योग्य ती पावले उचला. तुमच्या कॉलेजच्या ‘अँटी-रॅगिंग कमिटीशी’ (Anti-Ragging Committee) संपर्क साधा किंवा UGC च्या टोल-फ्री हेल्पलाइन नंबर १८००-१८००-५५२२ वर आपली तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, तुमची सुरक्षा आणि सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे.