Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षाचालकाचा मुलगा वयाच्या 21व्या वर्षी झाला IAS ऑफिसर, केलं वडिलांच्या कष्टाचे चीज

अंसार शेख याने 21व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास करत देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला. त्याची संघर्षमय यशोगाथा आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायक ठरते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2025 | 07:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

UPSC ही देशातली सगळ्यात कठीण परीक्षा मानली जाते. ती पास होण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि सातत्य लागतं. अशा परीक्षेत यश मिळवणं म्हणजे साधं काम नाही. पण अंसार शेख या तरुणानं हे अशक्य वाटणारं स्वप्न सत्यात उतरवलं. मूळचा जालन्याच्या एका छोट्याशा गावातला अंसार, ज्याचे वडील एक साधे रिक्षाचालक. घरची परिस्थिती फारच बेताची होती. शिक्षण घेताना अडथळे आलेच, पण तरीही त्यानं हार मानली नाही. अंसारनं UPSC ची तयारी करताना दररोज 12-13 तास अभ्यास केला.

तामिळनाडू इयत्ता ११ वीचा निकाल जाहीर; यंदा ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

2015 साली अवघ्या 21व्या वर्षी अंसार शेखनं जेव्हा UPSC परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अंतिम यादीत 361वा क्रमांक मिळवला, तेव्हा तो देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी ठरला. विशेष म्हणजे ही त्याची पहिलीच चाचणी होती. ज्या परीक्षेला वर्षानुवर्षे मेहनत करूनही अनेकजण अपयशी ठरतात, ती अती कठीण परीक्षा अंसारनं जिद्द, चिकाटी आणि अथक अभ्यासाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे पार केली.

अंसारचं शिक्षण पुण्यातल्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. तिथून त्यानं पॉलिटिकल सायन्स या विषयात पदवी घेतली आणि ग्रॅज्युएशनला तब्बल 73 टक्के गुण मिळवले. लहानपणापासूनच त्याच्या आयुष्यात संघर्ष होताच वडील रिक्षाचालक, घरात आर्थिक अडचणी, शिक्षणासाठी मर्यादित सुविधा पण या सगळ्याला बाजूला सारत त्यानं स्वतःची दिशा ठरवली आणि त्यासाठी झोकून दिलं.

जुळ्या बहिणींना जुळे गुण! अनु-तनूची सर्वत्र चर्चा… फक्त परीक्षेतील गुण नव्हे तर सर्वांगीण गुणही जुळतात

सध्या अंसार शेख पश्चिम बंगाल राज्यातील कूचबिहार जिल्ह्यात ADM (Additional District Magistrate) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. प्रशासनात आपलं काम प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने बजावत असतानाच, अंसार सोशल मीडियावरही सक्रिय आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर 3.43 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, आणि तिथूनही तो तरुणांशी संवाद साधत त्यांना प्रेरणा देत असतो. असं म्हणता येईल की अंसार शेख याची ही कहाणी केवळ यशाची नाही, तर एका सामान्य परिस्थितीतून असामान्य प्रवास घडवणाऱ्या मुलाची आहे. त्याचं जीवन हे अनेकांसाठी एक आशेचा किरण ठरलं असून, संघर्ष करणाऱ्या लाखो तरुणांसाठी तो आज एक जिवंत प्रेरणास्थान बनला आहे.

Web Title: Youngest ias ansar sheikh struggle success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • IAS exam
  • IPS

संबंधित बातम्या

Dr Shrikant Jichkar: वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी १४ पदव्या! ‘हा’ भारतीय विक्रम करणारे डॉ. श्रीकांत जिचकार नेमके कोण होते?
1

Dr Shrikant Jichkar: वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी १४ पदव्या! ‘हा’ भारतीय विक्रम करणारे डॉ. श्रीकांत जिचकार नेमके कोण होते?

Success Story: ‘तुला काहीच येत नाही’ म्हणणाऱ्यांना कसं दिलं उत्तर? अनु कुमारी यांची संघर्षमयी यशोगाथा एकदा वाचाच..
2

Success Story: ‘तुला काहीच येत नाही’ म्हणणाऱ्यांना कसं दिलं उत्तर? अनु कुमारी यांची संघर्षमयी यशोगाथा एकदा वाचाच..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.