Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवकांना Cop 30 साठी पर्यावरणविषयक चर्चेची संधी! मुंबईत ४५ युवकांचा सहभाग

भारतामध्ये प्रथमच युवकांना कॉप३० (COP30) परिषदेत सहभागी होऊन हवामान बदल, पर्यावरण संकट, शाश्वत उपाय, सर्क्युलर इकॉनॉमी यांसारख्या मुद्द्यांवर थेट योगदान देण्याची संधी मिळाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 22, 2025 | 05:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हवामान बदल आणि पर्यावरण संकटावर उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण एकत्र आले आणि भविष्यासाठी कृती करण्याचा निर्धार केला. मुंबईत झालेल्या या विशेष चर्चासत्रात सुमारे ४५ युवकांनी सहभाग घेतला. या संवादातून मिळालेल्या शिफारसी आणि चर्चेचे मुद्दे आगामी नोव्हेंबर २०२५ मध्ये ब्राझीलमध्ये होणाऱ्या कॉप३० (COP30) परिषदेत भारतीय युवा प्रतिनिधीत्वाचा भाग म्हणून सादर केले जाणार आहेत.

‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेतून नेत्र तपासणी! विद्यार्थ्यांना मोफत उच्च-गुणवत्तेचे चष्मे वाटप

“लोकल कॉन्फरन्स ऑफ यूथ (एलकॉय) इंडिया २०२५ सिटी कन्सल्टेशन सिरीज” या उपक्रमांतर्गत मुंबईतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट (AIILSG), अंधेरी येथे हे आयोजन करण्यात आले. इंडियन यूथ क्लायमेट नेटवर्क (IYCN) यांनी युनिसेफ इंडिया, सात्त्विक सोल फाउंडेशन, अॅग्रो रेंजर्स, NSS, प्रत्येक, माझी वसुंधरा आणि राज्य हवामान कृती कक्ष यांच्या सहकार्याने हे आयोजन केले.

या कार्यक्रमात युवकांनी स्थानिक पातळीवरील गंभीर प्रश्नांवर चर्चा केली. त्यात पूरस्थिती, तापमानवाढ, तीव्र हवामान घटना, जैवविविधतेची हानी, शहरीकरण, पाण्याचा अपव्यय अशा मुद्द्यांचा समावेश होता. युवकांनी शाश्वत उपाययोजना, सर्क्युलर इकॉनॉमी, कचरा व्यवस्थापन, हरित वाहतूक आणि हवामान शिक्षण यावर भर दिला.

एलकॉय मुंबई फॅसिलिटेटर पाखी दास यांनी सांगितले की, या चर्चासत्राचा उद्देश तरुणांना हवामान संकटासाठी उपाय शोधण्यासाठी सक्षम करणे आहे. “स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील समस्या, नैसर्गिक उपाय आणि युवक सक्षमीकरण” यावरही विशेष चर्चा झाली.

युवक प्रतिनिधी श्रेया साहे यांनी मुंबईसारख्या महानगरांमध्ये शाश्वत वाहतूक, कार्यक्षम कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संरक्षण या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर युनिसेफ महाराष्ट्राचे स्पेशालिस्ट युसुफ कबीर यांनी ‘माझी वसुंधरा’, ग्रीन कॅम्पस लॅब्स, युवक-नेतृत्वाखालील स्थानिक कृती अशा उपक्रमांची माहिती देऊन हवामान साक्षरतेवर भर दिला. हे चर्चासत्र “यंगो” (YOUNGO) या यूएनएफसीसीसीच्या अधिकृत युवा संस्थेशी संलग्न होते. येथे झालेले निष्कर्ष भारतीय राष्ट्रीय युवा सादरीकरणाचा भाग होतील आणि जागतिक स्तरावर युवकांचा आवाज पोहोचवतील.

Education Loan नाकारले जाण्याची प्रमुख कारणे? ‘या’ चुका करणे टाळा

या उपक्रमामुळे भारतातील तरुणांना पहिल्यांदाच कॉप३० या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेतील चर्चेत थेट योगदान देण्याची संधी मिळणार आहे. यामुळे भारताच्या युवकांचे जागतिक नेतृत्व बळकट होण्यास हातभार लागेल आणि पर्यावरण संरक्षणासाठी नवे मार्ग खुले होतील.

Web Title: Youth get a chance to discuss environment for cop 30

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Education Sector

संबंधित बातम्या

राज्यातील तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच तर 33572 शिक्षक प्रशिक्षणादरम्यान उत्तीर्ण
1

राज्यातील तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच तर 33572 शिक्षक प्रशिक्षणादरम्यान उत्तीर्ण

राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे रुपडं पालटणार; शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला…
2

राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे रुपडं पालटणार; शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला…

ना वाहतूक व्यवस्था, ना पक्का रस्ता ‘इथं’ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून काढावा लागतोय मार्ग
3

ना वाहतूक व्यवस्था, ना पक्का रस्ता ‘इथं’ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून काढावा लागतोय मार्ग

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक
4

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.