धक्कादायक ! 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; 14 महिन्यांपू्र्वीच झाला होता विवाह
वडगाव निंबाळकर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आता एका शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तू माझ्याशी लग्न नाही केले तर, तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन’, अशी धमकी संबंधित मुलीला देण्यात आली होती. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे ही घटना घडली.
15 वर्षीय मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. मेसेजवर धमक्या देत होते. ‘माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन’, अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मुलगी कंटाळली होती’.
सात एप्रिलला ‘तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई-वडिलांना जीवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याने संबंधित मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात विविध कलमांसह तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात केला जाता आहे.
नाशिकमध्येही आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, नाशिकच्या जेल रोड भागात एका वयोवृद्ध पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर या व्यक्तीने स्वतः साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. लता मुरलीधर जोशी (वय 76) आणि मुरलीधर रामचंद्र जोशी (वय 80) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. मुरलीधर जोशी हे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली.