Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

एका प्राध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवणे व तिचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2026 | 01:44 PM
विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:
  • विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं
  • प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
  • पालकवर्गात संतापाचे वातावरण
बारामती : शिक्षकी या पवित्र व्यवसायाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरात उघडकीस आली आहे. शिवनगर येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एका प्राध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवणे व तिचा छळ केल्याप्रकरणी ‘पोस्को’सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बारामती तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, पालकवर्गात तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

 

प्रा. नितीन शंकर तावरे (वय ४२, रा. सांगवी, ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित प्राध्यापक डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींना तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलवर अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवत असत. या संदेशांना प्रतिसाद न दिल्यास अंतर्गत गुण न देण्याची धमकी देत असल्याचेही समोर आले आहे. तसेच वर्गात शिकवताना विद्यार्थिनींना अयोग्य स्पर्श करणे, त्यांच्याजवळ जाणे आणि विरोध केल्यास वर्गात अपमानित करण्याचे प्रकार घडल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

२२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालकवर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक देविदास साळवे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग

स्लीपर बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला हडपसर पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे. तसेच, त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. निशिकेतकुमार यशवंत सिंग (वय ४७, रा. मीरा रोड, मुंबई) असे दोषारोपपत्र दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री दहा वाजता हैदराबाद येथून पुण्याकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये ही घटना घडली. संबंधित महिला आपल्या पतीसह स्लीपर सीटवर प्रवास करत होती. १० फेब्रुवारी रोजी पहाटे २ ते ४ या दरम्यान आरोपी निशिकेतकुमार यशवंत सिंगने वारंवार महिलेच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

Web Title: Police have registered a case against a professor who sent obscene messages to a student

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Baramati Crime
  • Baramati Police
  • crime news

संबंधित बातम्या

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…
1

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं
2

दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं

Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
3

Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Sindhudurg : इंधन समस्या मोठी समस्या आहे त्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणं गरजेच !
4

Sindhudurg : इंधन समस्या मोठी समस्या आहे त्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणं गरजेच !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.