21 वर्षीय तरुणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-ट्विटर)
मुंबई महानगरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून मुख्यमंत्र्यांच्या शहरातील म्हणजे ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबई शहरात सर्वाधिक 226 लैंगिक अत्याचार असून ठाण्यात 118 आणि पुण्यात 112 अत्याचाऱ्याच्या घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाइटवरून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
असे असताना दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका तरुणाने प्रेयसीला फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हे सुद्धा वाचा: नियमभंग करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल खान (21) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेलविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, नागपाडा येथे राहणारा 21 वर्षीय सोहेल खान आपल्या मैत्रिणीला कॉलेजमधून घरी सोडण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. खान त्याच्या मैत्रिणीला तिच्या घराऐवजी भायखळा येथील हॉटेलमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले.
दोघेही रिलेशनशिपमध्ये असून त्यांच्या पालकांनी त्यांच्या लग्नाला होकार दिल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. पण वडिलांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळेच वडील बरे झाल्यानंतर दोघांचे लग्न लावून देणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र सोहेलने तिला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या मैत्रिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने दावा केला की, तिने नकार देऊनही आरोपी सोहेल तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोहेलला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हे सुद्धा वाचा: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सातत्याने लैंगिक अत्याचार केले अन् गर्भवती होताच…
तरुणी, महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींमध्ये ओळखीच्याच व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे. नातेवाईक, प्रियकर, मित्र, शेजारी, वर्गमित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडूनच मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची माहिती अनेक घटनांमधून समोर आली आहे.