Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॉडेल दिव्या पाहुजा हत्याकांडातील आरोपीला अटक, BMW कारही जप्त; अद्याप मृतदेह सापडला नाही

गुरुग्राम पोलिसांनी मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येसाठी वापरलेली बीएमडब्ल्यू कार पंजाबच्या पटियाला येथून जप्त केली आहे. पटियालाच्या बसस्थानकाजवळ ही कार टाकून दिली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 05, 2024 | 11:34 AM
मॉडेल दिव्या पाहुजा हत्याकांडातील आरोपीला अटक, BMW कारही जप्त; अद्याप मृतदेह सापडला नाही
Follow Us
Follow Us:

सायबर सिटी गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये २७ वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या (Divya Pahuja Murder Case) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हत्याकांडाचा तपास सुरू असून या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  दिव्याच्या हत्येचा आरोप असलेल्या हॅाटेल मालक अभिजीत सिंगसह तीन आरोपींना गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. हेमराज आणि ओमप्रकाश अशी आरोपींची  नावं असुन हे दोघंही अभिजीतच्या हॅाटेलमध्ये काम करत होते. या सोबत तिन्ही आरोपींनी ज्या कारमधुन दिव्याच्या मृतदेह नेला ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र, पोलिसांना अद्याप तिचा मृतदेह नाही सापडला.

[read_also content=”अमेरिकेत नववर्षाच्या सुरुवातीलाच शाळेत गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, पाच जण जखमी https://www.navarashtra.com/world/one-studdents-died-and-five-injured-in-school-firing-in-america-nrps-495154.html”]

नेमकं प्रकरण काय

बुधवारी गुरुग्राम पोलिसांना माहिती मिळाली होती की, सेक्टर-14 मधील हॉटेल सिटी पॉइंट येथे एका महिलेचा खून झाला आहे. पोलिसांनी माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता बलदेव नगरमध्ये राहणाऱ्या मॅाडेल दिव्याचा हॉटेलमध्ये खून करून मृतदेह बाहेर कुठेतरी विल्हेवाटीसाठी नेल्याचे तपासात उघड झाले. मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद

चौकशी दरम्यान,  हॉटेलमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगळवारी रात्री 10.45 वाजता दिव्याचा मृतदेह घोंगडीत गुंडाळून हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये दोन जण ओढत असल्याचे दिसून आले. नंतर एक माणूस परत जाताना दिसले. या सीसीटिव्ही फुटेचच्या माध्यमातुन पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले आणि हॅाटेल मालक अभिजीत सिंगसह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

का केला दिव्याचा खून?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा मॉडेलिंग करत होती. दिव्याकडे आरोपी अभिजीत सिंगचे काही अश्लील फोटो होते, ज्याच्या मदतीने ती अभिजीतला ब्लॅकमेल करत होती. ती अनेकदा अभिजीत सिंगकडून खर्चासाठी पैसे घेत असे आणि आता तिला मोठी रक्कम उकळायची होती.

2 जानेवारीला आरोपी अभिजीत सिंह हा दिव्या पाहुजासोबत हॉटेल सिटी पॉइंटवर पोहोचला आणि तिला तिच्या फोनमधून अश्लील फोटो डिलीट करायचे होते, पण दिव्याने फोनचा पासवर्ड सांगितला नाही. याचा राग आल्याने त्याने दिव्यावर गोळी झाडली.

Web Title: 3 accused arrested in divya pahuja murder case bmz car seized nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2024 | 11:32 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.