हिंजवडीतील आयटी कंपनीकडून ४०० उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक
अमरावती : एका स्वच्छता कामगाराने पोस्ट ऑफिसमधून एटीएम चोरले आणि त्यातून 40 हजार रुपये काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 20 सप्टेंबर रोजी घडली. पोस्ट ऑफिसचे सहाय्यक अधीक्षक अतुल अरुण काळे (वय 38) यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी (दि. 31) वलगाव पोलिसांनी विशाल राजेंद्र गावंडे (32, रा. वलगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : Crime News: बनावट कंपन्या स्थापन करून बुडविला तब्बल ४९६ कोटींचा जीएसटी; ‘DGGI’ तर्फे तक्रार, गुन्हा दाखल
सत्यपाल वामनराव आयते यांचे वलगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे. जिथे त्यांनी एटीएम कार्ड काढण्यासाठी सब पोस्टमास्तर वलगाव यांच्याकडे अर्ज केला होता. अर्जानुसार एटीएम त्यांना देण्यात आले. मात्र, 18 सप्टेंबर रोजी उपस्थित न राहिल्याने हे एटीएम कार्ड किट पोस्ट ऑफिसमध्ये डिलिव्हरी न करता ठेवण्यात आले. 20 सप्टेंबर त्यांच्या खात्यातून प्रत्येकी 10,000 रुपये काढण्याचा संदेश आला. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी पुन्हा प्रत्येकी 10 हजार रुपये काढण्यात आले.
याबाबत त्यांनी लेखी तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे तपास करण्यात आला. त्यात नवसारीच्या एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढल्याची बाब समोर आली. त्यानंतर एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोस्ट ऑफिसमधील स्वच्छता कर्मचारी राजेंद्र गावंडे पैसे काढताना दिसले. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी राजेंद्रकडे चौकशी केली असता त्याने पैसे काढल्याचे कबूल केले. सहायक अधीक्षक अतुल काळे यांच्या फिर्यादीवरून वलगाव पोलिसांनी राजेंद्र गावंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बनावट कंपन्या स्थापन करून बुडविला ४९६ कोटींचा जीएसटी
बनावटी जीएसटी फर्म, बनावट आधार कार्ड, बनावट पॅनकार्डचा वापर करून 54 कंपन्या स्थापन करून तब्बल 496.27 कोटींचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी डायरोक्टारेट जनरल ऑफ जीएसटी विभागाने (डिग्गी) दिलेल्या तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश कुमार (वय २६, रा. देवडा जालोर, राजस्थान) आणि विरेंद्र कुमार (वय २६, रा. मुर्तला गाला, बाडमेर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत डीजीजीआयचे पुणे विभागाचे विभागीय माहिती अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दिली आहे.
हेही वाचा: Crime News: ‘आधी मोबाईल हिसकावला अन् तरुणाला थेट 300 फूट…’; हडपसर पोलिसांकडून स्नॅचर टोळीला अटक