अक्षय्य तृतीयेला दहावा हप्ता पडण्याची शक्यता
मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 65 महिलांच्या नावावर 20 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात हा प्रकार घडला आहे. संबंधित महिलांकडून ओळखपत्रे आणि अन्य कागदपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर करण्यात आला.
लाडकी बहीण योजनेच्या नावावर बनावट कागदपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मुंबईतील मानखुर्द परिसरात, तब्बल ६५ महिलांच्या नावाने २० लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मानखुर्दमधील एका महिलेसह चार ते पाच जणांचा सहभाग असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे, या फसवणुकीत एका वित्तीय संस्थेचे दोन कर्मचारीही सामील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोठ्या अडचणीत टाकण्यात आलं आहे.
Ladki Baheen Scheme: ‘या’ दिवशी मिळणार लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने हे कर्ज आयफोन खरेदीसाठी घेतलं होतं. कुर्ला आणि अंधेरीतील आयफोन गॅलरीमध्ये या महिलांच्या नावावरून कर्ज उचलून २० आयफोन खरेदी करण्यात आले. हे सर्व मोबाईल नंतर इतरांना विकून आरोपीने महिलांसह संबंधित वित्तसंस्थेलाही गंडा घातला. या प्रकारानंतर महिलांना कर्ज फेडण्यासाठी नोटीसा आल्या. तसेच संबंधित वित्तसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी महिलांशी संपर्क साधत कर्ज फेडण्याची मागणी केली. त्यावेळी या फसवणुकीचा पर्दाफाश झाला.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आरोपी शंकर घाडगे याने पद्मा कांबळे, सुलोचना दिवणाजी, सोनल नांदगावकर यांच्यासह इतर महिलांना “लाडकी बहीण” योजनेचा लाभ मिळवून देतो, असे सांगत त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासबुक यासारखी महत्वाची वैयक्तिक माहिती गोळा केली. यानंतर एका वित्तसंस्थेतील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे कर्ज मंजूर करून घेतले गेले. सध्या मानखुर्द पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
“सरकार दर महिन्याला थेट पैसे देणार आहे”, “फक्त काही कागदपत्रं आणि शुल्क द्या” – अशा आमिषांनी ठगांचे टोळके महिलांना सापळ्यात ओढण्यात आले. बनावट ओळखपत्रं, नकली अर्ज आणि आत्मविश्वासाने सांगितलेली खोटी माहिती यांचा वापर करून अनेक महिलांना हजारो रुपयांना गंडवल्याचे प्रकार समोर येत आहेत. ही फसवणूक गावांपासून ते शहरांपर्यंत पसरलेली असून, काही ठिकाणी या टोळ्यांनी चक्क ऑफिसेस सुरू करून आपली फसवणूक व्यावसायिक पद्धतीने सुरू केली आहे.
महिलांच्या हातात फॉर्म, शिक्के आणि दस्तावेज दिल्याने ही योजना खरीच शासकीय आहे, असा विश्वास निर्माण होतो. विशेषतः आर्थिक अडचणीत असलेल्या महिला अशा आमिषाला सहज बळी पडतात. या ठगांकडून ‘नोंदणी शुल्क’ म्हणून काही रक्कम घेतली जाते आणि त्यानंतर संबंधित व्यक्ती संपर्काबाहेर जातात. या फसवणुकीसाठी सोशल मीडिया, वॉट्सॲप मेसेजेस आणि थेट मोबाईल कॉल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामुळे महिलांनी सावध राहावे आणि अशा खोट्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन कऱण्यात आले आहे.