लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणारच (Photo Credit- Social Media)
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे आतापर्यंत ९ हप्ते महिलांना मिळाले आहेत. त्यानंतर आता महिला एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. या सगळ्यात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अक्षय तृतीयेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती समोर आली आहे. सुरूवातीला ६ एप्रिलपर्यंत रामनवमीच्या दिवशी पैसे येतील, अशी चर्चा होती. पण रामनवमी उलटून गेल्यानंतरही पैसे जमा न झाल्याने महिलांचा हिरमोड झाला होता.
लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबात आता नवी माहिती समोर आली आहे. यावेळी ३० ए्प्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. अक्षय तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त मानला जात असल्याने या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. पण याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.
Sahdev Betkar in Shivsena : उबाठाचा मित्रपक्षालाच दणका; रत्नागिरीतील मोठा नेत्याने बांधले शिवबंधन
दरम्यान, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण याबाबतही अद्याप कोणतीही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली नाही. राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्याने सध्या महिलांना २१०० रुपये देणे शक्य नाही. पण परिस्थिती सुधारल्यावर २१०० रुपये देऊ, असं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होत. त्यानंतरही जाहिरनामा पाच वर्षांसाठी वैध असतो. या कालावधीत आम्ही आपल्या प्रिय भगिनींना कोणत्याही वेळी २१०० रुपये देऊ शकतो. याचा अर्थ असा की पुढील पाच वर्षांत त्यांना २१०० रुपये मिळू शकतात, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनीही याबाबत माहिती दिली.
दगडापासून वाळू योजनेला आता उद्योगाचा दर्जा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला एप्रिल महिन्यातील हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत असताना, एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत, तब्बल ६५ महिलांच्या नावावर बनावट पद्धतीने २० लाख रुपयांचं कर्ज उचलण्यात आलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात हा प्रकार घडला असून, संबंधित महिलांकडून ओळखपत्रे आणि अन्य कागदपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतील मानखुर्द परिसरात गरीब महिलांना योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात ६५ महिलांची नावं आणि त्यांची वैयक्तिक कागदपत्रं वापरून त्यांच्याच नावावर जवळपास २० लाख रुपयांचं कर्ज उचलण्यात आलं आहे. परिणामी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना कर्जबाजारी करून त्यांच्यावर अनायासे आर्थिक ओझं टाकण्यात आलं आहे.