Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान; ‘त्या’ 6 जणांवर गुन्हा दाखल

नगर रस्त्यावरील केसनंद भागातील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 01:53 PM
भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्...

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्...

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान
  • 6 जणांवर गुन्हा दाखल
  • बनावट आधारकार्ड केले जप्त
पुणे : चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया शनिवारी सायंकाळी पूर्ण झाली. या निवडमुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतदानाच्या दिवशी नगर रस्त्यावरील केसनंद भागातील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्या सहा जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे.

 

याप्रकरणी मोहम्मद एहसान नजर (वय २०), अर्षद रोशन अली (वय २२), अखिलेश बिजूकुमार प्रसाद (वय २०), दिलीप सक्रु चव्हाण (वय ३६), प्रेमदास रामचंद्र राठोड (वय ३०), अश्विनी प्रेमदास राठोड (वय २७) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेले आरोपी बांधकाम मजूर आहेत. ते सध्या केसनंद भागातील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहायला आहेत. याबाबत पोलीस हवालदार बाळासाहेब हराळ यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मतदान शनिवारी (७ फेब्रुवारी) पार पडले. केसनंद भागातील श्री जोगेश्वरी विद्यालयाच्या आवारातील मतदान केंद्रात तीन आरोपींनी मतदान केले. तीन जणांची मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले तीन आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. उर्वरित तीन आरोपी वाशीम जिल्ह्यातील आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

बोगस मतदानाचे गालबोट; नवयुवक मतदारांचा संताप

​जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे ‘बोगस मतदानाची’. काही संवेदनशील केंद्रांवर धक्कादायक प्रकार समोर आले. अनेक नवयुवक मतदार, जे पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी उत्सुक होते, जेव्हा केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांचे मतदान आधीच झाल्याचे त्यांना मतदान अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ​हा प्रकार उघडकीस येताच केंद्राबाहेर मोठा गोंधळ झाला. “आम्ही लोकशाहीचा उत्सव साजरा करायला आलो होतो, मात्र आमच्या हक्काचे मत कुणीतरी आधीच देऊन गेले, हे लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी संतापजनक प्रतिक्रिया एका युवती मतदाराने दिली. काही गावांमध्ये यामुळे दोन गटांत शाब्दिक चकमकीही उडाल्या, ज्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. एकीकडे मतदानाचा उत्साह असताना दुसरीकडे प्रशासकीय सावळागोंधळ आणि बोगस मतदानाच्या तक्रारींमुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते.

Web Title: A case has been registered against those who cast bogus votes in the pune zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Bogus Voting

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.