दोन परप्रांतीय तरूणांना यवतमाळमध्ये भरदिवसा लुटले;
दारव्हा : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे एका तरूणाची हत्या करण्यात आली. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याची माहिती दिली जात आहे. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री नऊ वाजताच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील पाळोदी येथे घडली.
हेदेखील वाचा : पोलिस असल्याचे सांगून भंगार व्यावसायिकास लुटणारी सराईत टोळी जेरबंद ; गुन्हे शाखेकडून लाखोंचा माल जप्त
सुनिल रमेश जोगदंड (वय 32) असे मृताचे नाव आहे. तर रविंद्र किसन भभुतकर (42, रा. पाळोदी) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपीने रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास सुनिल याच्या डोक्यावर लोखंडी रॉड करून हत्या केली. हा थरार दारव्हा तालुक्यातील पाळोदी गावात घडला. गंभीर जखमी अवस्थेत सुनिल जोगदंड याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम दारव्हा व नंतर यवतमाळ येथे आणले. मात्र, यवतमाळ येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी चिरूमुल्ला रजनीकांत व पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मध्यरात्रीच पाळोदी गावात धाव घेतली.
घटनाक्रम समजून रात्रीच आरोपी रविद्र किसन भभुतकर याला ताब्यात घेतले. मृत सुनिल जोगदंड याचे यवतमाळ येथे शवविच्छेदन झाल्यानंतर पाळोदी गावात अंत्यविधी करण्यात आला. यामुळे सकाळपासून पाळोदी गावात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
सुनिलचा भाऊ रवी रमेश जोगदंड (39, रा. पाळोदी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रविंद्र किसन भभुतकर याच्याविरुध्द खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान, सोमवारी दारव्हा न्यायालयाने आरोपी रविंद्र भभुतकर यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक चिरुमल्ला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.