शाळेच्या मुख्याध्यापकासह 4 जणांचा विद्यार्थीनीवर वारंवार सामूहिक लैगिंक अत्याचार (फोटो सौजन्य-X)
Chhattisgarh Molestation: अल्पवयीन मुलींना पळवून नेणे, त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर विनयभंग व अत्याचार करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुली असुरक्षित वातावरणाच्या सावटात असल्याचे जिल्ह्यात चित्र निर्माण झाले आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळे सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे अल्पवयीन मुली व त्यांच्या पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी बदलापूर शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता.त्यातच आता छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. यामध्ये धक्कादायर म्हणजे ज्या शिक्षकांना आई वडिलांनंतर श्रेष्ठ स्थान आणि गुरु पूजनीय मानतो, त्यांनीच दानवी कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
छत्तीसगडमधील या आदिवासी मुलीवर शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक आणि एक वनरक्षकांनी सामूहिक अत्याचार केला. छत्तीसगडमधील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात ही घटना घडली.या अल्पवयीन मुलीचे वय 17 वर्षे असून ती घरी राहून अभ्यास करायची.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारीनुसार १५ नोव्हेंबर रोजी एका आरोपीने सरकारी शाळेतील ११ वीच्या विद्यार्थिनीला त्यांच्या कारमधून दुसऱ्या आरोपीच्या घरी अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. तिसरा आरोपी तिथे आधीच हजर होता. यानंतर या तिघांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि सर्वात घृणास्पद म्हणजे या घटनेचा त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओदेखील बनवला.
यानंतर या गुन्हेगारांनी मुलीला धमकी दिली की, घटनेबाबत कोणाला सांगितले तर सोशल मीडियावर पोस्ट करू. तिन्ही आरोपींनी मुलीला ब्लॅकमेल करून २२ नोव्हेंबर रोजी पुन्हा भाड्याच्या घरात तिच्यावर अत्याचार केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, धमकीनंतर मुलगी घाबरली होती पण नंतर तिने हिंमत दाखवली आणि तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सरकारी शाळेतील तीन शिक्षकांसह चौघांना मंगळवारी अटक करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जनकपूर पोलिस स्टेशन परिसरात १५ आणि २२ नोव्हेंबर रोजी मुलीवर दोनदा बलात्कार झाला होता. दोन लोक सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील आणि मुख्याध्यापक दुसऱ्या सरकारी प्राथमिक शाळेतील होते. चौथा व्यक्ती वनविभागाचा कर्मचारी आहे.