संग्रहित फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुषणतप्पा मठ यांचा मुलगा सोमेश्वर मठ याचा सुमारे दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूचा धक्का तसेच स्वतः अपंगत्वामुळे गुरुषणतप्पा मठ मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती समोर आली आहे. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या ड्राय क्लिनिंगच्या दुकानातील आराम खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच त्यांचा मुलगा आकाश मठ यांनी त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भापकर आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.
भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या
माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच वडीलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका ४२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना वाकड गुरुवारी (२७ ऑगस्ट) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ईशान सोसायटी येथील प्रथम बंगल्यात उघडकीस आली आहे. मयत विवाहिता वाकड येथील भाजपा नगरसेविकेच्या नणंद होत्या. शिल्पा सचिन गवारे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेचे भाऊ संतोष गुलाब कलाटे (वय ४७, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती सचिन उत्तम गवारे, सासरा उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे आणि दीर संदीप उत्तम गवारे (सर्व रा. ईशान सोसायटी, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






