Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनी नैराश्येत; महाविद्यालयाच्या इमारतीवरून घेतली उडी अन्…

विद्यार्थिनीने चाकूच्या साहाय्याने हाताची नस कापली आणि त्यानंतर महाविद्यालयाच्या इमरातीवरून उडी घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेच्या तपासादरम्यान चाकू जप्त केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 23, 2025 | 12:21 PM
पत्नीची आत्महत्या, पतीवर गुन्हा दाखल

पत्नीची आत्महत्या, पतीवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

अमरावती : कमी गुण मिळाल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने हाताची नस कापून थेट इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 21) उघडकीस आली असून, मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित महाविद्यालयात बीएचएमएसच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने हा प्रयत्न केला.

हेदेखील वाचा : इंदापूरातील अफूच्या शेतीवर पोलिसांचा छापा, 3 जणांना घेतले ताब्यात; तब्बल 27 लाखांची झाडे जप्त

21 फेब्रुवारी रोजी 11 वाजताच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विद्यार्थिनीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. माहितीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी महाविद्यालय व रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या विद्यार्थिनीने आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत परीक्षेत गुण कमी मिळाल्याचे कारण सांगितले आहे. परंतु, पोलिसांनी मुलीचे बयाण नोंदविले असता, पाय घसरून पडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले आहे.

चाकूने कापली हाताची नस

विद्यार्थिनीने चाकूच्या साहाय्याने हाताची नस कापली आणि त्यानंतर महाविद्यालयाच्या इमरातीवरून उडी घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेच्या तपासादरम्यान चाकू जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी महाविद्याल परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मुलीने तिसऱ्या माळ्यावरून उडी घेतल्याचे दिसत आहे.

कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

छेडछाडीमुळे एका तरुणीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा भागात ही घटना घडली असून, तरुणीला त्रास देऊन तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

बदनामीकारक मजकुरामुळे तरुणीचा विवाह मोडला

दुसऱ्या एका घटनेत, बदनामीकारक पत्रके वाटल्याने तरुणीचा विवाह मोडल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी बदनामी थांबविण्यासाठी तरुणीकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास सोशल मिडीयात अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीच्या भावाने लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेदेखील वाचा : विक्रम गायकवाड हत्येप्रकरणी एसआयटीची स्थापना; पोलीस अधीक्षकांची माहिती; रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट

Web Title: A student attempt of suicide incident in amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • Amravati News
  • attempted suicide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.