समुपदेशनाच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण
श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. असे असताना हवाई दलात अधिकारी असलेल्या महिलेने विंग कमांडरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या अधिकारी महिलेने विंग कमांडरने आपल्याला रात्री दोन वाजता फोन करून रुमवर बोलावल्याचे म्हटले आहे.
हेदेखील वाचा : सायबर चोरट्यांकडून पुण्यातील तिघांची फसवणूक; तब्बल 68 लाखांना घातला गंडा
ऑफिसर्स मेसमध्ये न्यू इयर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अधिकारी महिलाही उपस्थित होती. रात्री 12 वाजेपर्यंत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू राहिले आणि नंतर हळूहळू एक-एक करून लोक पार्टी सोडून जाऊ लागले. पार्टी संपली तोपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते आणि ही महिला घरी जायला तयार होती, तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. हा कॉल विंग कमांडरचा होता. या अधिकाऱ्याने नवीन वर्षाची भेट मिळाली की नाही? असे महिलेला विचारले. त्यावर तिने नाही म्हटले. त्यावर ‘तुझी भेट माझ्या खोलीत ठेवली आहे…’, असे म्हटले. त्यानंतर लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने आरोप केला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
पीडित महिला अधिकारी श्रीनगर एअरफोर्स येथे कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिचा छळ होत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, 8 सप्टेंबर 2024 रोजी बडगाम पोलिस स्टेशनमध्ये अत्याचारासंबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
गेल्या दोन वर्षांपासून होतोय छळ
गेल्या दोन वर्षांपासून श्रीनगर एअरफोर्स स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून सतत छळ, लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
हेदेखील वाचा : साखर निर्यात परवानगीला टाळाटाळ; केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीलाच प्राधान्य शक्य