Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात भूमी अभिलेख उपअधीक्षकांना ७५ हजारांची लाच घेताना ACB कडून अटक

तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी नियोजित सापळा रचून आरोपीला अटक केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 22, 2024 | 08:45 PM
लाचेची रक्कम घेऊन महिला पोलिसाने ठोकली धूम; पण एसीबीने पाठलाग करून पकडून आणलं

लाचेची रक्कम घेऊन महिला पोलिसाने ठोकली धूम; पण एसीबीने पाठलाग करून पकडून आणलं

Follow Us
Follow Us:

शिरवळ: खंडाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक उर्मिला अशोक गलांडे (वय ४७) आणि त्यांच्या कार्यालयातील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी उर्फ साक्षी शिवाजी उमाप (वय २८) यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने लोणंद येथील सिटी सर्व्हे नंबर १७७/४२८ या मिळकतीवरील सत्ता प्रकार बदलण्यासाठी अर्ज सादर केला होता, ज्यासाठी उपअधीक्षक गलांडे यांनी १,००,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम ७५,०००/- ठरविण्यात आली.

तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी नियोजित सापळा रचून कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी उमाप यांना ७५,०००/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. यानंतर उपअधीक्षक उर्मिला गलांडे आणि स्विटी उमाप यांच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाणे, जिल्हा सातारा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस उप-अधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, यामध्ये पो.हवा. नितीन गोगावले, पो.कॉ. विक्रमसिंह कणसे, म.पो.कॉ. स्नेहल गुरव, आणि चा.पो.हवा. अजित देवकर यांनी सहभाग घेतला.

पोलीस हवालदाराला ५ हजारांची लाच घेताना अटक

अपघात प्रकरणात कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पुनावळे येथे करण्यात आली. ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय ४४) असे लाच घेणाऱ्या पोलिसाचे नाव असून ते रावेत पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

तक्रारदार हे व्यापारी असून तक्रारदार यांच्या मुलाचा आणि एका दुचाकीस्वाराचा पुनावळे येथे अपघात झाला होता. त्याबाबत एमएलसी झाल्यानंतर हवालदार बगाडे यांनी या अपघात प्रकरणी जबाब नोंदवून अपघात मिटवून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी बगाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजाराची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी करून पुनावळेतील गंधर्व हॉटेलसमोर सापळा रचला. तसेच पाच हजारांची लाच घेताना बगाडे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

Web Title: Acb arrest land record deputy officer in shirwal pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 08:45 PM

Topics:  

  • Bribe Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.