न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधिक्षकास निलंबित करण्यात आले आहे. इतकेच नाहीतर त्यांचे बँक खाते व मालमत्ता यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयकडून आता तयारी केली जात आहे.
तलाठ्याने त्या व्यक्तीचा फेरफार नोंद करून तो मंजुरीसाठी मंडल अधिकारी मारुती चोरमले याच्याकडे पाठवला होता. संबंधित फेरफार मंजूर न होण्यासाठी तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी हरकत घेतली.
४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडहिंग्लज पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सांगली (Sangli) महापालिकेचे उपायुक्त ७ लाखांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. उपायुक्त वैभव साबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी १० लाखांची खंडणी मागितली होती, असा आरोप करण्यात आला…
इचलकरंजी शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले होते. आपण रंगेहात पकडल्याचे लक्षात येताच राठीचा रक्तदाब अचानक वाढला.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
दरम्यान, या विभागातील भ्रष्ट कारभाराने त्रस्त काही मंडळींनी कारवाई झाल्याचे समजल्यानंतर चक्क महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.
ठेकेदाराकडून ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने सापळा कारवाई करून पकडले आहे. शिरूर तालुक्यातील भांबर्डे ग्रामपंचायत परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
शाळेस शासनाकडून 100 टक्के अनुदान मिळते, असे असतानाही तक्रारदार यांनी मुलाच्या शिक्षणाची वार्षिक फी 1550 रुपयांपैकी 800 रुपये शाळेला यापूर्वी दिले होते. तर उर्वरित 750 रुपये देणे बाकी होते.
पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार व्यक्तीचा डेअरी व दुध विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने 31 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास डेअरीमधील दूध विक्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यामुळे कारवाई करण्यात आली.
सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. यासाठी महानगर पालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
जमिनीच्या गट नंबरमध्ये खाडाखोड होऊन चुकीच्या गट नंबरची नोंद झाली होती. सदर खाडाखोड करणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून पूर्ववत सातबारा आणि फेरफार दुरुस्त करून मिळण्यासाठी अर्ज केला होता.