Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: रत्नशिव निंबाळकरची हत्या करून आरोपी फरार; अंजली दमानिया संतापल्या

मृत रत्नशिव निंबाळकर यांची पत्नी प्राजक्ता निंबाळकर यांनी बहीण शीतल शिंदे आणि त्यांच्या लहान मुलांसह अंजली दमानियांची भेट घेतली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 29, 2025 | 01:06 PM
Satara Crime: रत्नशिव निंबाळकरची हत्या करून आरोपी फरार; अंजली दमानिया संतापल्या
Follow Us
Close
Follow Us:

बीड: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच बीडसह राज्यातील अनेक भागातील गुन्हेगारीच्या, हत्येच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सक्रिय भूमिका घेतली. त्यांनी या हत्येच्या निषेधार्थ आवाज उठवला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी पोलिस आणि प्रशासनाला आवाहन केले की, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली होती.

या प्रकरणानंतर अंजली दमानिया यांनी आता आणखी एक प्रकरणात आवाज उठवला आहे. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द गावचा तरुण रत्नशिव संभाजी निंबाळकर यांचा 12 मार्चला निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

ChatGPT चा वापर न करताही तयार करू शकता Ghibli-Style ईमेज, Grok AI सह हे टूल्स करणार तुमची मदत

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रत्नशिव निंबाळकर यांची पत्नी प्राजक्ता निंबाळकर यांनी बहीण शीतल शिंदे आणि त्यांच्या लहान मुलांसह अंजली दमानियांची भेट घेतली. त्यानंतर अंजली दमानिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांचीही भेट घेत पोलिसांनी या प्रकरणात त्वरीत कारवाई करून मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणात लक्ष घालून रत्नशिव निंबाळकर प्रकरणात तातडीने कारवाई कऱण्याचे निर्देश दिले आहेत.

अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत या प्रकऱणाकडे लक्ष वेधलं आहे. “आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं.३२ वर्षीय रत्नाशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा १२ मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला. आईवडील, विधवा बहीण, तिची २ मुलं, तो व त्याची पत्नी व २ मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मिलिटरी मधे होता, तिथून त्याला काढून टाकण्यात आले होते असे त्या गावाची लोकं सांगतात. ह्या माणसाचे लग्न झाले नव्हते व त्याचा एक स्त्री बरोबर संबंध होते. ह्या माणसाला पूर्ण गाव “काका” म्हणायचं.

म्यानमारमध्ये 200 वर्षांतील सर्वात तीव्र भूकंप; 694 मृत्यूंची पुष्टी, हजारो जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

रत्नाशीलनी माझी गावात बदनामी केली या मुळे त्याने मनात राग घेऊन दत्तात्रयनी त्याच्याच आडनावाच्या व्यक्तीचा निर्दयी पणे खून केला.१२ मार्चला बहिणीचा मुलाची १० वी ची परीक्षेला त्याला रत्नशील सोडायला गेला, तिथून घरी येताना, दत्तात्रय नी त्याला गाडीने उडवला आणि खाली पडल्यावर कोयत्याने त्याला अनेकदा मारले. हा अजून फरार आहे. तिथल्या पत्रकारांनी बातमी देखील केली नाही कारण त्याच्यावर “दबाव” आहे. कसला दबाव ? काय हे ?

आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं.

३२ वर्षीय रत्नाशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा १२ मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला.

आईवडील, विधवा बहीण, तिची २ मुलं, तो व त्याची पत्नी व २ मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती.… pic.twitter.com/8gaZYyYZsw

— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 28, 2025

ह्या आरोपी दत्तात्रयचा सख्खा भाऊ हा भाजप चा फलटण चा सरचिटणीस आहे. त्यांना हात जोडून विनंती, कृपया ह्या कुटुंबाला मदत करा आणि न्याय होऊ द्या . मी SP समीर शेख अतिशय चांगले अधिकारी आहेत. मी यांच्याशी बोलले. ते स्वतः लक्ष घालून या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर नक्कीच मिळवून देतील. फोटो इतके भयाण आहेत की ते मी नाही पाठवू शकत. पण त्या आरोपी दत्तात्रय निंबाळकर चा फोटो मी ट्वीट करत आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यात न्याय होईल ह्यासाठी आपण निर्देश द्यावेत.” असं लिहीत त्यांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची विनंती केली आहे.

Web Title: Accused absconds after killing ratnashiv nimbalkar anjali damania is furious nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • anjali damania

संबंधित बातम्या

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला
1

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला

“मुंडे कुटुंबाचे राजकारण आता संपले आहे, वंजारी समाजासाठी वेगळे नेतृत्व…; अंजली दमानिया यांचा मोठा दावा
2

“मुंडे कुटुंबाचे राजकारण आता संपले आहे, वंजारी समाजासाठी वेगळे नेतृत्व…; अंजली दमानिया यांचा मोठा दावा

मंत्र्यांमध्ये कारवाई न करण्यावरुन स्पर्धा सुरु हे धक्कादायक; अंजली दमानिया महायुतीवर भडकल्या
3

मंत्र्यांमध्ये कारवाई न करण्यावरुन स्पर्धा सुरु हे धक्कादायक; अंजली दमानिया महायुतीवर भडकल्या

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा येणार? अंजली दमानिया यांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा
4

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा येणार? अंजली दमानिया यांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.