द केरला स्टोरी (The Kerala Story) चित्रपट बॅाक्स ऑफिसवर सुसाच कमाई करत असताना अजुनीह वादच्या भोवऱ्यातुन निघाला नाही आहे. अद्यापही सिनेमावरुन रोज काही ना काही वाद होण्याच्या घटना घडत आहेतच. या संदर्भात इंदूरमधून एक बातमी आली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर इंदूरमधील एका मुलीच्या लक्षात आले की चित्रपटात सांगितल्याप्रमाणेच तिच्यासोबतही घडत आहे. तिला तिच्या जोडीदारानेहे फूस लावत तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि आता धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत आहे. आता तिनेही पोलिस ठाण्यात धाव घेतली असून धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या मोहम्मद फैजान या मुस्लिम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
[read_also content=”अबब! अडीच लाख रुपये किमतीचा एक किलो आंबा; नाव आहे मियाझाकी, तुम्हाला खायला आवडेल का? https://www.navarashtra.com/india/miyazaki-is-the-costliest-mango-in-world-nrps-402570.html”]
चार दिवसांपूर्वी ही मुलगी तिच्या बॅायफ्रेंड फैजानसोबत मल्टिप्लेक्समध्ये केरळ स्टोरी चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर मुलीला जाणीव झाली तीच्यासोबतही असंच घडत आहे. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. तिच्या बॅायफ्रेंडने तिला अनेकवेळा इस्लाम स्वीकारण्यास सांगितले तसेच या प्रकरणावरून 18 मे रोजी तिला मुलीला मारहाणही केली होती. चित्रपटादरम्यान मुलीने आरोपीला अनेक प्रश्न विचारले असता, तो संतापला आणि तिला गप्प बसण्याची सूचना केली. त्यानंतर आरोपींने तिला मारहाणही केली. यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ती मुलगी आणि तिचा बॅायफ्रेंड हे कोचिंग क्लासमध्ये भेटलो. त्याने तिच्याशी आधी मैत्री केली आणि नंतर तिच्याशी प्रेमाच्या नावावर जवळीक साधली. तो गेल्या चार वर्षांपासून तरुणीच्या संपर्कात होता आणि त्याने अनेकवेळा तिचे शोषणही केले होते.
केरला स्टोरीने आतापर्यंत किती कमावले
रविवारपर्यंत चित्रपटाची एकूण कमाई 198 कोटी रुपये होती. या वर्षात एवढी कमाई करणारा पठाणनंतरचा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. 17व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी सिनेमाने 11.50 कोटींची कमाई केली. वादामुळे बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या चित्रपटावर दीर्घकाळ बंदी घालण्यात आली होती. यानंतरही चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे.