Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानवी मूत्र पाजलं, मिरचीची धुरी, तोंडाला काळ फासून 77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न अवस्थेत काढली धिंड! अमरावतीतील धक्कादायक घटना

Amravati Crime : पीडित महिला जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची गावात नग्न अवस्थेत धिंड काढली. नंतर तोंडाला काळं फासलं. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 18, 2025 | 01:04 PM
77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न अवस्थेत काढली धिंड! (फोटो सौजन्य-X)

77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न अवस्थेत काढली धिंड! (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Amravati Crime News Marathi: पुरोगामी राज्याला लाजवेल अशी एक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अमरावतीमधील मेळघाटच्या चिखलदरा परिसरातील रेट्याखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करत तिची गावातून धिंड काढण्यात आली. ही संतापजनक घटना 30 डिसेंबरची असून तब्बल 18 दिवसांनी म्हणजेच काल 17 तारखेला समोर आली आहे.

ग्रामस्थ नुसतं धिंड काढून थांबले नाही तर, तिच्या तोंडाला काळे फासून तिला मानवी मूत्र प्यायला लावले. तिला मिरचीची धुरी देण्यात आली. तिच्या गळ्यात बूट व चपलांचा हार घालण्यात येऊन गावातून फिरवले. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांवर गुन्हा दाखल केले आहे. तमात्र, जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Badlapur crime : ‘शेजारचा दादा आला आणि कडेवर घेऊन अंधाऱ्या ठिकाणी…,’ ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; बदलापूर पुन्हा हादरलं

काय आहे प्रकरण?

काळमी नंदूराम शेलूरकर (वय ७७) असे पीडित महिलेचे नाव आहे. कलामी सेलुकरमुळे रेट्घाखेडा येथे घरात एकटीच राहायची. मुलगा राजकुमार आणि त्याची पत्नी शामू गावाबाहेर काम करायचे. तर त्यांची दोन मुले शिक्षणाकरिता वसतिगृहात राहतात. ही महिला ३० डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता उठून प्रातर्विधीसाठी गेली होती.यावेळी शेजारी येथे राहणारा सायबू चतुर व त्याच्या पत्नीने या महिलेला शोधून काढले आणि तिला पकडले आणि पोलिस पाटील बाबू जामुणकर यांना बोलावले. आमच्या घराच्या बाजूला जादूटोणा करीत असल्याचा आरोप त्यांनी काळमीवर केला. बाबू जामूनकर याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायबू चतुर, साबूलाल चतुर, रामजी चतुर व इतरही ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी मरण केली. या महिलेला दोरखंडाने बांधत लोखंडी साखळीचे चटके दिले. एवढेच नाही तर त्यांनी या वृद्ध महिलेला मिरचीची धुरी दिली. तिच्या गळ्यात चप्पल बुटांचा हार घातला. तिला मानवी मूत्र पाजले. तिला मारहाण केली. व तिची धिंड पूर्ण गावातून काढली. हा सर्व प्रकार ग्रामस्त पाहत होते. मात्र, या महिलेच्या मदतीला कोणी आले नाही. गावातील पोलीस पाटील बाबुभाई नावाच्या व्यक्तिने हे क्रूरकर्म केलं. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी फुटली घटनेला वाचा

महिलेने व तिच्या कुटुंबीयांनी ६ जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात जात या प्रकरणी तक्रार दिली. पण पोलिसांनी फक्त मारहाण करण्याचा गुन्हा नोंदवला. पीडित राजकुमार शेलुकर आणि शामू शेलुकर यांच्या घटनेची तक्रार पोलिस अधीक्षकांनी केली. यानंतर, पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात गंभीरपणे हस्तक्षेप केला. पीडित वृद्ध महिला ही मारहाण झाल्यानंतर तिच्या सोनोरी येथे राहत असणाऱ्या मुलीच्या घरी निघून गेली आहे. तिला मोठा धक्का बसला आहे. वृद्ध महिलेच्या शेतात आरोपी पोलिस पाटलाने अतिक्रमण करून अंगणवाडी बांधल्याचा आरोप तिच्या मुलांनी केला आहे.

वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत अनेक गुन्हे दाखल केले आहेत. पण जादूटोण्याच्या कायद्यानुसार कोणताही गुन्हा दाखल करता येत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जादूटोण्याशी संबंधित गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.

Walmik Karad: जेल की बेल? सरपंच हत्या प्रकरणात कराडच्या जामीनावर सुनावणी; CID चे कोर्टात आव्हान

Web Title: Amravati black magic case shocking incident 77 year old tribal woman lynched on suspicion of witchcraft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 01:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.