वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण
बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराडला देखील एसआयटी कोठडी सुनावली आहे. दरम्यान वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा आरोप केला हात आहे. दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कावर करण्यात आली आहे. त्यानंतर वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी कोर्टाने सुनावली आहे. मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याला बीड कोर्टाने कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज वाल्मीक कराडच्या केज कोर्टात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
केज कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये केज कोर्टाने वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जाला सीआयडीने कोर्टात आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडची चौकशी करायची आहे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी विनंती सीआयडीने कोर्टासमोर केली आहे. आज कराडच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. कोर्ट वाल्मीक कराडला जामीन देते की सीआयडीची मागणी मान्य करते ते पहावे लागणार आहे.
माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला – वाल्मीक कराडची पत्नी
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समोर आलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज वाल्मिक कराडला बीडच्या न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी, माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला आहे, मला कोण न्याय देणार? असा सवाल केला आहे.
हेही वाचा: Walmik Karad Big Breaking: सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मकोका लागताच कराडचा ताबा आता…
मंजिली कराड म्हणाल्या, “आज संतोष देशमुख यांचे कुटुंबीय न्याय मागायला मनोज जरांगे यांच्याकडे जात आहेत. माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झाला आहे. मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागतेय, मला न्याय कोण देणार आहे. मीडिया ट्रायल करून माझ्या नवऱ्याची एक एक गोष्ट बाहेर काढत आहेत. ज्यांनी ज्यांनी हे केले, त्यांचीही प्रकरणे मी बाहेर काढणार आहे. यामध्ये सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे आणि अंजली दमानिया यांच्याही काही गोष्टी मी बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! ‘MCOCA’ लागताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली; थकवा अन्…, SIT च्या उपस्थितीत उपचार सुरू
वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीत वातावरण तापलं
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात केज कोर्टाने आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यासोबतच वाल्मीक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परळीतील वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.