संग्रहित फोटो
अक्षय महादेव बोंबाळे (वय २८, रा. पुणा गेस्ट हाऊस, बुधवार पेठ) असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. रॉकी रणजित पात्रौ तसेच विकी रणजित पात्रौ (रा. रेल्वे कॉर्टर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अक्षय बोंबाळे हे रेल्वेचे जीआरपीएफचे कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे रेल्वे रूळ तसेच इतर परिसरात गस्त व पेट्रोलिंगचे काम आहे. दरम्यान, ते रेल्वे रूळ परिसरात गस्त घालत असताना त्यांना आरोपी हे गांजा ओढताना दिसून आले होते. याबाबत त्यांनी आरोपींना काही वेळा हटकले होते. तसेच, त्यांना हाकलून दिले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता.
दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळी देखील त्यांना रेल्वे रूळ परिसरातून हाकलले होते. अक्षय हे कर्तव्यावरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना साडे आठच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रोडवरील ससून हॉस्पिटलच्या फुटपाथजवळ अडवले. दुचाकी अडवून शिवीगाळ सुरू केली. नंतर एकाने तु आईला ‘दारू व गांजा पितो’ हे का सांगितले असे म्हणत वाद घातला. तसेच, आरोपींनी खाली पाडून धारदार चाकूने गळा चिरून व छातीवर वार करून केले. तर एकाने त्याच्या डोक्यात दगड घातला. आरोपींनी अक्षय याच्याजवळील मोबाईल तसेच दीड लाख रुपयांची सोन्याची चैन देखील हिसकावून पोबारा केला.
हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक राहुल पवार, उपनिरीक्षक प्रदीप शितोळे, कर्मचारी ज्ञानेश्वर गायकवाड, महेश जाधव आणि त्यांच्या पथकाने या पसार झालेल्या आरोपींना नाना पेठेतून पकडले. आरोपींच्या हल्यात अक्षय हे गंभीर जखमी झाले आहेत. गळ्यावर ९ टाके पडले असून, छातीवर दोन टाके पडले आहेत. तर त्यांच्या डोक्याला देखील गंभीर मार लागला आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.






