Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२००० रुपयांसाठी कर्ज वसुली ॲप एजंट्सने पत्नीचे बनावट फोटो केले व्हायरल; पतीने उचलले टोकाचे पाऊल

आंध्र प्रदेशातील एका तरुणाने दोन हजार रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केली. कर्ज वसुली ॲप एजंट्सने तरुणाच्या पत्नीची बनावट अश्लील फोटो मित्र आणि कुटुंबीयांना पाठवले होते. नेमकं कारण काय?

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 11, 2024 | 08:30 PM
२००० रुपयांसाठी कर्ज वसुली ॲप एजंट्सने पत्नीचे बनावट फोटो केले व्हायरल (फोटो सौजन्य-X)

२००० रुपयांसाठी कर्ज वसुली ॲप एजंट्सने पत्नीचे बनावट फोटो केले व्हायरल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

अनेकदा काही अपरिहार्य कारणांमुळे पैशांची तातडीची गरज निर्माण होते. त्यावेळी आपल्या ओळखीच्या अथवा जवळच्या नातेवाईकाकडून अपेक्षित रक्कम मिळेलच असे नाही. तसेच बँक,कर्मचारी सोसायटी अशा पर्यायांतून विनातारण कर्ज त्वरित मिळेलच असेही नाही. अशा वेळी गरजेपोटी लोक झटपट कर्ज इन्स्टंट लोन) हा पर्याय निवडतात. असे झटपट कर्ज देणारी बरीचशी अ‍ॅप्स मोबाईलवर उपलब्ध आहेत.ज्यामुळे अनेक तोट्यांना देखील सामारे जावं लागत. अशीच एक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे.दोन हजार रुपयांच्या कर्जाला कंटाळून आंध्र प्रदेशातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. कर्ज वसुली ॲप एजंट्सने तरुणाच्या पत्नीचे खोटे (Editing) अश्लील फोटो बनवून मित्र आणि कुटुंबीयांना पाठवली होते. या लज्जास्पद कृत्याला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. या घटनेमुळे कर्जवसुलीच्या चुकीच्या आणि गुन्हेगारी पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

25 वर्षीय नरेंद्रने 28 ऑक्टोबर रोजी आपल्या मैत्रिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दोघेही विशाखापट्टणम येथे राहत होते. नरेंद्र हा व्यवसायाने मच्छीमार होता, मात्र खराब हवामानामुळे तो काही दिवस कामावर जाऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ढासळली.

BEST Accident: कुर्ल्यानंतर सीएसएमटी परिसरात बेस्ट बसचा अपघात, बेस्ट बसखाली येऊन एकाचा मृत्यू

दोन हजार रुपयांच्या कर्जाने जीव घेतला

आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नरेंद्रने ऑनलाइन ॲपवरून 2 हजार रुपयांचे कर्ज घेतले. काही आठवड्यांतच कर्जाची परतफेड करण्यासाठी ॲपच्या एजंटांनी त्याला त्रास देणे आणि शिवीगाळ करणे सुरू केले. यानंतर आरोपीने नरेंद्रच्या पत्नीचे एडिट केलेले फोटो तयार केले. आणि या फोटोवर किंमतही लिहिलेली होती. यानंतर अश्लील एडीट केलेले फोटो ऑनलाइन ॲपवरून नरेंद्रच्या कुटुंबाना आणि मित्रांना पाठवण्यात आले.

कर्जफेडीनंतरही धमक्या थांबल्या नाहीत

जेव्हा ही छायाचित्रे पत्नीच्या फोनवर पोहोचली तेव्हा तिने नरेंद्रला विचारले आणि त्यानंतर तिला कर्जाची माहिती मिळाली.दोघांनी मिळून संपूर्ण कर्ज फेडले, मात्र तरीही धमक्या आणि छळ सुरूच होता.काही दिवसांतच ओळखीच्या लोकांनी नरेंद्रला फोटोंबद्दल विचारायला सुरुवात केली. हे सर्व ऐकून तो पूर्णपणे तुटला. हा अपमान सहन न झाल्याने त्याने लग्नाच्या सहा महिन्यांनंतर मंगळवारी आत्महत्या केली.

आठवडाभरातील तिसरी घटना

आंध्र प्रदेशात आठवडाभरात घडलेली ही तिसरी घटना आहे. नंद्याल जिल्ह्यात एका तरुणीने ॲप एजंटच्या धमक्यांमुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तिला वाचवले. ऑनलाइन कर्ज ॲप्स कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करून कर्ज प्रदान करतात. परंतु त्यांच्या कर्जवसुलीच्या अमानवीय पद्धतींवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शासनाच्या कठोरतेचे आश्वासन

आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री अनिता यांनी गेल्या महिन्यात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. अशी कर्जे वसूल करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल, असे ते म्हणाले होते. हे ॲप्स कमी कागदपत्रांच्या नावाखाली सर्वसामान्यांना अडकवतात आणि नंतर अवैध मार्गाने त्यांचा छळ करतात. त्यांचा छळ एवढा गंभीर आहे की लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे.

Atul Subhash: मर्द को भी दर्द होता है…! अतुल सुभाषसह प्रत्येकी 10 पैकी 7 पुरुषांची आत्महत्या, WHO चा धक्कादायक अहवाल

Web Title: Andhra pradesh man suicide over loan app harassment wife morphed pics patni ki fake ashlil photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 08:30 PM

Topics:  

  • Andhra Pradesh

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे
1

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित, टीटीडीने दिले कारण
2

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित, टीटीडीने दिले कारण

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल, दरमहा कमावले कोट्यवधी रुपये; कसं ते जाणून घ्या
3

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल, दरमहा कमावले कोट्यवधी रुपये; कसं ते जाणून घ्या

धक्कादायक! हिंदूंच्या भावना दुखावल्या? ‘या’ प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादामध्ये आढळले झुरळ? पहा Viral Video
4

धक्कादायक! हिंदूंच्या भावना दुखावल्या? ‘या’ प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादामध्ये आढळले झुरळ? पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.