Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित, टीटीडीने दिले कारण

तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने ख्रिश्चन धर्माचे पालन केल्याच्या आरोपाखाली चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. टीटीडीने सांगितले की चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 19, 2025 | 01:07 PM
तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित, टीटीडीने दिले कारण (फोटो सौजन्य-X)

तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित, टीटीडीने दिले कारण (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Tirumala Tirupati Devasthanam News in Marathi:  तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने चार कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. हिंदू धार्मिक संस्थेत नोकरी करूनही त्यांनी ख्रिश्चन धर्माचे पालन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, जो ट्रस्टच्या संस्थात्मक आचारसंहितेचे उल्लंघन मानला जात होता,अशी माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून देण्यात आली आहे.

याप्रकरणी टीटीडी प्रशासनाने सांगितले की, दक्षता अहवाल आणि अंतर्गत चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी हिंदू धार्मिक संस्थेत काम करताना अपेक्षित धार्मिक आचरणाचे पालन केले नाही असे ट्रस्टचे म्हणणे आहे.

भारतासह ‘या’ तीन देशांमध्ये जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के; पहाटेच्या सुमारास झाला भूकंप

हे चार कर्मचारी निलंबित

१. बी. एलिझर – उपकार्यकारी अभियंता (गुणवत्ता नियंत्रण)

२. एस. रोझी – स्टाफ नर्स, बर्ड हॉस्पिटल

३. एम. प्रेमावती – ग्रेड-१ फार्मासिस्ट, बर्ड हॉस्पिटल

४. डॉ. जी. असुंता – एसव्ही आयुर्वेदिक फार्मसी

टीटीडीच्या मते, दक्षता विभागाच्या अहवालातून आणि इतर कागदपत्रांमधून या कर्मचाऱ्यांशी संबंधित ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्यांबद्दल माहिती समोर आली. त्यानंतर, नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करून सर्वांना निलंबित करण्यात आले.

संस्थेची विश्वासार्हता राखण्यासाठी कठोर पावले

टीटीडीने स्पष्ट केले की, हिंदू धार्मिक संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या परंपरा आणि मूल्यांनुसार वागणे अपेक्षित आहे. समान शिस्त आणि विश्वासार्हता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टीटीडीचे नियम २००७ मध्ये बदलण्यात आले

तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) चे सेवा नियम २००७ मध्ये बदलण्यात आले, ज्या अंतर्गत गैर-हिंदूंच्या नवीन नियुक्त्यांवर बंदी घालण्यात आली. तथापि, पूर्वी नियुक्त केलेले गैर-हिंदू कर्मचारी अजूनही सेवेत आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना टीटीडीमधून काढून टाकले जाईल आणि इतर सरकारी खात्यांमध्ये पाठवले जाईल.

टीटीडीचे सध्याचे नियम काय आहेत?

टीटीडीच्या सध्याच्या नियमांनुसार, केवळ हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे लोकच संस्थेत नोकरीसाठी पात्र आहेत. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू धर्म आणि मंदिर परंपरांचा आदर करणे आवश्यक आहे.

टीटीडी बोर्डाचे म्हणणे आहे की ते गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या इतर विभागात स्थानांतरित करण्यासाठी किंवा त्यांना स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) देण्याच्या दिशेने देखील काम करत आहेत.

बिहारमध्ये रोड शोमदरम्यान प्रशांत किशोर जखमी, तातडीने हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

Web Title: Tirumala tirupati devasthanams suspends 4 employees for allegedly following a non hindu faith citing violation of institutional code

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • india

संबंधित बातम्या

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
1

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
2

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
3

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
4

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.