धक्कादायक! पती-पत्नीचा वाद; संतप्त बापाने १८ महिन्यांच्या मुलाला बोअरवेलमध्ये टाकलं
राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक धक्कादायक बातमी आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग एका बापाने १८ महिन्यांच्या मुलावर काढला आहे. या चिमुकल्याला नराधम बापाने मुलाची हत्या करून मृतदेह बोअरवेलमध्ये फेकून दिला. जमवरमगडच्या दीपोला गावात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जयपूर येथील आपत्ती निवारण पथक मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी रवाना झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला दारूचं व्यसन आहे. त्यामुळे त्याचा त्याच्या पत्नीशी बराच काळ वाद सुरू होता. आरोपीची पत्नी मुलाला सोडून तिच्या पालकांच्या घरी राहात होती. मुलगा बराच काळ आजारी होता. त्यामुळे घरात तणावाचं वातावरण होतं. दरम्यान बुधनारी रात्री आरोपी रात्री उशिरा मुलाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेला. वाटेत त्याने मुलाची हत्या केली आणि मृतदेह बोअरवेलमध्ये फेकून दिला. आरोपीचे वडील आणि भाऊ त्याच घरात राहतात.
धक्कादायक ! साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार; नराधमाने बालिकेला घरी नेलं…
मुलाची हत्या करून बोअरवेलमध्ये टाकल्याची माहिती पोलिसानी मिळाली होती. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान पोलिस आणि आपत्ती निवारण पथकही दीपोला गावात पोहोचलं आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मुलाचा शोध घेण्यात येत आहे.