पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात मंगळवारी मध्यरात्री मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके मद्यप्राशन करताना आढळले असल्याचा आरोप करत रुग्णालय परिसरातच मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी मोठा राडा झाला. या घटनेनंतर मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून पोलीस ठाण्य़ात एकमेकांविरोधात तक्रारी देण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी 20-25 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे लक्ष्मण हाके यांनी दारूच्या नशेत मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्यचा आरोप मराठा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.तर दुसरीकडे, लक्ष्मण हाके यांनी हा पूर्वनियोजित गट असून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न आसल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “संध्याकाळी 7वाजण्याच्या सुमारास मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. मित्राच्या घरून जात असताना काही 20-25 तरुण माझ्याकडे आले आणि माझी कॉलर धरून हात धरून मला जीव मारण्याचा प्रयत्न केला. या पूर्वनियोजनत कट होता. मला पकडणाऱ्यांपैकी दोन-तीन जण मला पाच वाजता माझ्याशी बोलून गेले होते. त्यांनीच मला पकडले. आधी माझ्याशी चांगले बोलले होते. संध्याकाळी मित्राच्या घरून जेवण करून येत असताना माझ्या दिशेने पाच ते सहा फोर व्हिलर आल्या. मी मोटरसायकलवर होतो. त्यांनी माझी मान पकडली, हात पकडला मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता.
हेही वाचा:Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात शिव ठाकरे करणार कल्ला, फिनाले वीकमध्ये
मी जर दारु प्यायली असेल तर मी वैद्यकीय चाचणी करण्यासाठी तयार आहे. माझ्या चाचणीत सर्वकाही दिसून येईलच. जोपर्यंत माझ्यासोबत पोलिसांचा ताफा होता. तोपर्यंत हे लोक माझ्याशी बोलून गेले होते. त्यांनी मला दारू पिलास की नाही सांग असं म्हणत माझ्याकडून वधवून घेण्याचाप प्रयत्न केला.
दरम्यान, मद्यपानाचा मुद्द्यावरून झालेल्या या वादानंतर लक्ष्मण हाके यांनी वैद्यकीच चाचणी केली. या चाचणीच्या प्राथमिक अहवालात त्यांनी दारून पिलेली नव्हती, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. पण या अहवालाची पुन्हा एकदा तपासणी करण्यासाठी त्याचे रिपोर्ट्स प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा: भारत बांग्लादेश सामन्यात पाचव्या दिनी पावसाचं सावट? वाचा कानपूरच्या हवामानाचा अहवाल