हल्ला झाल्यानंतर करीना कपूर सैफ अली खानला काय म्हणाली ? चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफअली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आली. पण पोलिसांनी आरोपींबाबत अनेक खुलासेही केले आहेत. हल्लेखोराला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या आरोपीबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद शरीफुल हा बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलीस तापासात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शरीफुल हा बांगलादेशी नागरिक असून तो अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बेकायदेशीररित्या भारतात दाखल झाला. तो बांगलादेशातील झलोकाटी जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुंबई येऊन तो एका हॉटेलमध्येही काम करून लागला. आरोपी त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे ताब्यात घेण्यात आले. धक्कादायक म्हणजे, सैफ अलीखानच्या घरात घुसखोरी करण्यापूर्वी त्याने अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खानच्या घराची रेकी केली होती. पण चोरी करण्यासाठी सैफ अली खानचे घर अधिक सोपे असल्याने त्याने सैफअली खानच्या घरात घुसला होता. धक्कादायक म्हणजे, सैफ अलीखानचा मुलगा ‘जहांगीर’ याचे अपहरण करून तो त्याच्याकडून पैसेही उकळणार होता.
Yogesh Mahajan Death: अभिनेता योगेश महाजनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कुटुंबीयांनी दिली माहिती
सैफअली खानवर हल्ला करणारा हा बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासातून समोर आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे. विरोधी महाविकास आघाडीचे आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही टिकेची झोड उठवली. ” गेल्या दहा वर्षांपासून देशात भाजपचे सरकार असतानाही बेकायदेशीररित्या देशात असे रोहिंग्या घुसत असतील तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे अपयश आहे. अस असेल केंद्र सरकारची नेमकी जबाबदारी काय आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे.” अशी टिका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
तर या सापांना दुध पाजणारे लोक आतापर्यंत बीएमसीत सत्तेत होते. त्यांच्या खासदारांना मतदान केलेल्या खासदांरांना मतदान केलेल्या मतदारांची यादी पाहा, त्यातील किती मुंबईचे आहेत आणि किती बाहेरचे आहेत. याचाही तपास करा, असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
चंद्रावर निर्माण झालाय मोठा धोका; जाणून घ्या कोणी दिला इशारा? WMF ची यादी धडकी
संजय राऊत म्हणाले की, भाजपचे लोक सैफ अली खानवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा करत आहेत. आंतरराष्ट्रीय कट काय आहे? एका अभिनेत्यावर हल्ला झाला आहे आणि लोकांना सत्य सांगायला हवे. जर तो बांगलादेशी असेल तर केंद्र सरकार जबाबदार आहे. ही अमित शहांची जबाबदारी आहे. सर्व बांगलादेशींना बाहेर काढले पाहिजे आणि त्याची सुरुवात शेख हसीना यांच्यापासून झाली पाहिजे, ज्यांना आश्रय देण्यात आला आहे. ते फक्त मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे भीती निर्माण करत आहेत. जेव्हा आम्हाला संसदेत बांगलादेशींविरुद्ध बोलायचे होते तेव्हा भाजपने आंतरराष्ट्रीय संबंधांचा हवाला देऊन आम्हाला थांबवले.
दुसरीकडे, अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच, आरोपीच्या बांगलादेशी संबंधाचे पुरावेही पोलिसांना सापडले आहेत. आरोपी बांगलादेशातून भारतात कसा आणि कोणत्या मार्गाने आला याचा तपास पोलिस करत आहेत.