Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबू-सोनाचे हट्ट पुरवता पुरवता चोर झाला! वडील AirForce मध्ये अन् स्वतः ही B.Tech इंजीनियर, तरी करायचा चोऱ्या

B.Tech : ग्वाल्हेर GRP ने ट्रेनमध्ये प्रवाशांचे सामान चोरणाऱ्या एका B. Tech इंजीनियर तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चक्क 34 बॅगा, लॅपटॉप मोबाईलसमवेत जवळपास 8.26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 27, 2026 | 08:23 PM
बाबू-सोनाचे हट्ट पुरवता पुरवता चोर झाला! वडील AirForce मध्ये अन् स्वतः ही B.Tech इंजीनियर, तरी करायचा चोऱ्या

बाबू-सोनाचे हट्ट पुरवता पुरवता चोर झाला! वडील AirForce मध्ये अन् स्वतः ही B.Tech इंजीनियर, तरी करायचा चोऱ्या

Follow Us
Follow Us:
  • प्रेयसीचे हट्टे पुरवता पुुरवता चोर झाला
  • एसी कोचमधील प्रवाशांना करायचा लक्ष्य
  • पोलिसांकडून जप्त बॅगांच्या मालकांचा शोध सुरू
प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. पण हा आंधळेपणा अनेकदा गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवण्यास भागही पाडतं. त्याची प्रचिती अनेकदा अनेकांना आली आहे व ती जगजाहीरही झाली आहे. मध्यप्रदेशातही असाच एक प्रेयसीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराबाबत घडलं आहे. भावानं प्रेयसिचे हट्ट पुरवता पुरवता केव्हा गुन्हेगारी जगात पाऊलं ठेवलं हे त्यालाच कळालं नाही. अन् हो, हा चोर चांगला शिकलेला. B. Tech इंजीनियर. तरी प्रेमापोटी औदसा सुचली व होत्याचं नव्हतं करून बसला.
धक्कादायक बाब म्हणजे या मुलाचे वडीलं देशसेवा करतात. ते Air Force मध्ये कार्यरत आहेत. अशा चांगल्या कुटुंबातून आलेल्या या पोरानं आंधळ्या प्रेमापोटी आपल्या घरच्यांची मान शरमेनं खाली घालवायला भाग पाडली.

ग्वाल्हेर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

ग्वाल्हेर जीआरपी (रेल्वे पोलीस) यांच्या मते, त्यांनी अशा एका व्यक्तीला अटक केली आहे, जो खुद्द B. Tech इंजीनियर आहे. हा आरोपी आपल्या प्रेयसिचे हट्ट पूरवण्यासाठी लांब पल्ल्यांच्या ट्रेनमधील एसी डब्ब्यांमध्ये प्रवाशांचे सामान चोरायचा. आधी तो श्रीमंत प्रवाशांना हेरायचा. नंतर ते झोपले की, त्यांची बॅग घेऊन येईल त्या स्टेशनवर उतरायचा. पोलिसांनी या आरोपीकडून 34 बॅग जप्त केल्या आहेत. या बॅगेतील सामानाची किंमत 8 लाख 26 हजारांच्या घरात जाते.

Otur Crime News: जुन्नर तालुक्यात घरफोड्या करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

एसी कोचमधून करायचा प्रवास

ट्रेनमधील प्रवाशांना लुटण्यासाठी आरोपी कथितरित्या एक खास रणनीति वापरायचा. तो चांगले व महागडे कपडे परिधान करत एसी कोचने प्रवास करायचा, जेणेकरून इतर प्रवाशांना त्याच्यावर संशय येणार नाही. प्रवासादरम्यान तो इतर प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असायचा. ज्यावेळी प्रवाशांचे लक्ष इतरत्र ठिकाणी गेले की, तो त्यांची बॅग घेऊन पुढील स्टेशनवर उतरायचा.

या आरोपीचे नाव दिलीप मौर्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार B. Tech इंजीनियर असलेल्या दिलीपचे वडील सध्या Air Force मध्ये कार्यरत आहेत. दिलीपने आपल्या प्रेयसिची हौस व हट्ट पुरवण्यासाठी चोरी करण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान जीटी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या चोरीच्या सामानाचे प्रकरणही समोर आले. गोल का मंदिर परिसरातील प्रगती विहारचे रहिवासी असलेल्या दीपक शर्मा यांच्या सामानाचा तपास करताना दिलीप पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याशिवाय नागपुरची रहिवासी असलेल्या विशाखा शशिकांत यांच्या सामानाच्या चोरीच्या प्रकरणातही दिलीपचे नाव समोर येत आहे.

चिठ्ठीतून अश्लील मागणी, मोटारसायकलला आग; पीडितेच्या छळ प्रकरणी पिंपरी न्यायालयाचा मोठा निकाल

जीआरपीने आरोपीकडील सर्व 34 बॅगा जप्त केल्या आहेत. त्यात ट्रॉली बॅग, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर महागड्या सामानांचा समावेश आहे. या सर्व सामानांची एकूण किंमत 8 लाख 26 हजारांच्या घरात जाते. जीआरपीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किर्ती नरवरिया यांच्या मते, आरोपी सुरुवातीला एका फायनान्स कंपनीत काम करायचा. आर्थिक नुकसानीनंतर त्याची परिस्थिती बदलली. मग त्याने चोरी करण्यास सुरुवात केली.

पोलीस आता हे माहिती करून घेत आहेत की, त्याने कोण-कोणत्या ट्रेनमधील प्रवाशांना निशाणा बनवले होते व जप्त करण्यात आलेला सामना कोणत्या प्रवाशांचा आहे. दरम्यान, आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे.
जीआरपीला अपेक्षा आहे की, या चौकशीतून जप्त केलेला सामानाबाबत योग्य ती माहिती मिळू शकेल. तसेच त्यातून याप्रकरणाशी निगडीत आणखीन किती तथ्य समोर येणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने चोऱ्या करण्यास का सुरुवात केली?

    Ans: आपल्या प्रेयसीचे (गर्लफ्रेंडचे) महागडे हट्ट आणि हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱ्या करण्यास सुरुवात केली.

  • Que: ग्वाल्हेर रेल्वे पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: ग्वाल्हेर जीआरपीने दिलीप मौर्या नावाच्या बी.टेक. इंजिनिअर तरुणाला ट्रेनमधील प्रवाशांचे सामान चोरी केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे.

  • Que: आरोपी ट्रेनमध्ये चोरी कशी करायचा?

    Ans: आरोपी महागडे कपडे घालून एसी कोचमधून प्रवास करायचा. प्रवासी झोपल्यानंतर किंवा त्यांचे लक्ष नसताना तो त्यांच्या बॅगा घेऊन पुढील स्टेशनवर उतरायचा, असा पोलिसांचा आरोप आहे.

Web Title: B tech engineer arrested train theft gwalior grp 34 bags seized rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • air force
  • BTech
  • Theft Case

संबंधित बातम्या

Kolhapur Crime News: चोरी केली, थार घेतली अन् चुलत्याकडूनच कौतुक करून घेतले! कोल्हापुरातील अजब चोरीचा पर्दाफाश
1

Kolhapur Crime News: चोरी केली, थार घेतली अन् चुलत्याकडूनच कौतुक करून घेतले! कोल्हापुरातील अजब चोरीचा पर्दाफाश

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?
2

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.