Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड निघाला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ; अमेरिकेत आवळल्या मुसक्या

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 18, 2024 | 08:23 PM
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड निघाला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ; अमेरिकेत आवळल्या मुसक्या

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड निघाला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ; अमेरिकेत आवळल्या मुसक्या

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर गेल्या महिन्यात भारत सरकारने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या प्रकरणी केंद्रीय गृह विभाग किंवा एनआयए अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.

बाबा सिद्दीकी प्रकरणासंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अनमोल बिश्नोईला कॅलिफॉर्नियामध्ये ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सोपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनमोल बिश्नोई याच्यावर राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी हत्याकांड आणि अभिनेता सलमान खानच्या बांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. कित्येक दिवसांपासून तो फरार होता. राष्ट्रीय तपास यंत्रणाने त्याच्यावर अनेक दोन गुन्हे नोंद केले आहेत. काही दिवसांपूर्वी एनआयएने अनमोल बिश्नोईला अटक करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा केली होती. दरम्यान मुंबईतील या दोन्ही घटनांमध्ये मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई असल्याचं समोर आल्यानंतर मुंबई पोलीस आणि एनआयए त्याच्या मागावर होते.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने नुकतेच अनमोल बिश्नोईबद्दल माहिती देणाऱ्याला ₹ 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएने 2022 मध्ये दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष मोक्का न्यायालयात अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबारप्रकरणी लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोई यांना मुंबई पोलिसांनी वाँटेड घोषित केले आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांची आरोपी म्हणून नावे ठेवली आहेत. अनमोल बिश्नोईने सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती, त्यानंतर त्याच्याविरोधात लुकआउट सर्कुलर जारी करण्यात आले होते.

क्राईमच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोन्ही भाऊ आरोपी आहेत. १२ ऑक्टोबर रोजी जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ तीन बंदुकधाऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक मोठा गँगस्टरही बिष्णोई टोळीच्या रडारवर असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. श्रद्धा वॉकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी आफताब पूनावालाची तिहार तुरुंग प्रशासनाने अलीकडेच सुरक्षा वाढवली होती. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान बिष्णोई टोळीने आफताब पूनावालाला लक्ष्य करण्याचा कट रचला होता.

अनमोल बिश्नोई उर्फ ​​भानू हा गायक-राजकारणी सिद्धू मूसवाला यांच्या हत्याप्रकरणातही आरोपी आहे. 2023 मध्ये त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. बनावट पासपोर्टचा वापर करून त्याने भारतातून पलायन केलं होतं. तो नेहमी त्याचे ठिकाण बदलत तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. गेल्या वर्षी केनियामध्ये आणि यावर्षी कॅनडामध्ये दिसला होता. त्याच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत आणि जोधपूर तुरुंगात त्याची शिक्षा भोगली आहे. 7 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

Web Title: Baba siddique case mastermind lawrence bishnoi brother anmol bishnoi arrested in us california

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 07:42 PM

Topics:  

  • Lawrence Bishnoi

संबंधित बातम्या

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित
1

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित

कॉमेडियन कपिल शर्माची वाढवली सुरक्षा, बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय
2

कॉमेडियन कपिल शर्माची वाढवली सुरक्षा, बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध होणार मोठी कारवाई; ‘या’ कारणामुळे अल्बर्टाचे सरकार आक्रमक पवित्र्यात
3

कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध होणार मोठी कारवाई; ‘या’ कारणामुळे अल्बर्टाचे सरकार आक्रमक पवित्र्यात

Lawrence Bishnoi : तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली? सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न
4

Lawrence Bishnoi : तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली? सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.