गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतून लहान मुल पळवणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे आणि खूप गंभीर बाब आहे. अशी एक पत्र राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होत. नवी मुंबई परिसरात लहान मुल…
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिला छतावरून फेकण्यात आलं. गंभीर जखमी अवस्थेत तिचा मृत्यू झाला. आरोपींनी अटकवेळी पोलिसांवर गोळीबार केला; प्रत्युत्तरात दोघेही जखमी होऊन ताब्यात.
गडचिरोली जिल्ह्यात प्रसूतीची सुविधा नसल्याने 6 किमी जंगलातून पायपीट करणाऱ्या 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाला. दुर्गम भागातील तोकड्या आरोग्य सुविधांमुळे ही हृदयद्रावक घटना घडली.
अकोल्यातील मोठी उमरी परिसरात समलिंगी नात्यातील संशय व वादातून 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली. लिव्ह-इन पार्टनरने मारहाण केल्याचे तपासात उघड झाले असून आरोपी ताब्यात आहे.
दक्षिण नागपूरमध्ये आई-वडिलांनीच 12 वर्षांच्या मुलाला साखळी–कुलूप लावून घरात कोंडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चाईल्ड हेल्पलाइनच्या तक्रारीनंतर बाल संरक्षण कक्षाने हस्तक्षेप करत मुलाची सुटका केली.
मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भवती महिला पोलीस शिपायावर अंधेरी पोलीस ठाण्यातच पतीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पतीसह सासरच्या पाच जणांवर छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप आहेत.
सोलापुरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची धारदार शस्त्राने हत्या झाली. उमेदवारी अर्ज माघारीवरून वाद उफाळला. भाजप उमेदवारासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अकोला–खामगाव महामार्गावर तरुणीचा पाठलाग करून अश्लील शब्दांत बोलत हातवारे केल्याचा आरोप पोलिस उपनिरीक्षकावर झाला आहे. डायल 112 मुळे तरुणीची सुटका झाली असून आरोपी PSI ला अटक करण्यात आली आहे.
म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असलेल्या गर्वांगचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणी उपचारांत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाकाली वैद्यकिय अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.
Former IG Amar Singh Chahal Suicide Attempt: पंजाब पोलिसांचे माजी पोलीस महानिरीक्षक अमर सिंह चहल हे त्यांच्या राहत्या घरात गंभीर अवस्थेत सापडले असून त्यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न…
छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात मुख्याध्यापकाने शाळेतील स्वयंपाकीणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. विभागाने चौकशी सुरू केली आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे याने ऍट्रॉसिटी अर्थसाह्याचा दुसरा हप्ता खात्यात जमा करून देण्यासाठी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ११ व १२ डिसेंबर रोजी सापळा कारवाई राबविण्यात…
घुग्घूसच्या धानोरा पॉईंटवर सिमेंट भरलेल्या भरधाव बलकरने कार, सलून व हॉटेलला धडक दिली. कारमधील तिघे गंभीर जखमी झाले, सलून चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर हॉटेल चालक भाजला. ट्रकचालक पसार.
कोल्हापुरात पुणे–बेंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल चौकात भरधाव इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला शेकोटी करत उभ्या असलेल्या तिघांना चिरडले. पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चालकाबाबत तपास सुरू.
सोलापूरच्या वळसंग गावात अनैतिक संबंधाच्या संशयातून लक्ष्मण वाघमारे (35) याचा निर्घृण खून झाला. आठवडा बाजारात आरोपीने कोयत्याने हल्ला करून दगडाने ठेचले. परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिस तपास सुरू आहे.
अकोल्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संतोष घावडे यांची लोखंडी पाईपने हत्या करण्यात आली. आरोपी राम गिरामला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड परिसरात बी.एस्सी. शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडिलांची ओढ व मानसिक अस्वस्थतेमुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन्ही आरोपी अटकेत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा गावात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.