लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये मुनव्वर फारुकीचेही नाव? धक्कादायक माहिती समोर
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हेतूंशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. यासंदर्भात आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, कॉमेडियन मुनव्वर फारुकीचे नावही त्याच्या हिटलिस्टमध्ये आहे. एका वृत्तानुसार, बिश्नोई गँगचे दोन शूटर मुनव्वरच्या मागावर होते, जे काही दिवसांपूर्वी दिल्लीतील कार्यक्रमात पोहोचले होते. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत.
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर पोलिस बिष्णोई टोळीच्या नेटवर्कचा तपास करत आहेत. दरम्यान, सलमान खान व्यतिरिक्त मुनव्वर फारुकीसह अनेक नेते आणि सेलिब्रिटींचीही नावं हिटलिस्टमध्ये असल्याचं वृत्त आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला सप्टेंबर महिन्यापासून बिश्नोई टोळी लक् केलं आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते मुंबईहून दिल्लीला गेले होते. मुनव्वर ज्या फ्लाइटमध्ये होता त्या फ्लाइटमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे दोन शूटरही होते. दोघांनी दक्षिण दिल्लीतील सूर्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. मुनव्वरही याच हॉटेलमध्ये थांबला होता. दिल्ली पोलिसांची टीम आधीच त्या शूटर्सचा शोध घेत होती कारण त्यांनी दिल्लीच्या एका व्यावसायिकाची हत्या केली होती.
दिल्ली पोलिसांच्या पथकाला त्या हॉटेलमध्ये शूटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. यापूर्वी मुनव्वर फारुकीला धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी धमकी आणि हॉटेलमध्ये बिष्णोई टोळीच्या कार्यकर्त्यांचा मुक्काम जोडला असता परिस्थिती जुळली. यानंतर असे मानले जात होते की हे दोघेही मुनव्वर फारुकी शूट करण्याचा प्लॅन घेऊन आले होते. मुनव्वर फारुकीही आपल्या शोमध्ये धर्माशी निगडीत टोमणे मारत असल्याने ही भीती व्यक्त करण्यात आली होती. यावरही बिष्णोई टोळीचा राग कायम आहे. मीडिया हाऊसच्या काही अधिकाऱ्यांनी मुनव्वर हे टोळीचे लक्ष्य असल्याची पुष्टी केली.
तसेच लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानच्या जवळच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. हे पाहता कपिल शर्माच्या नावाचीही नेटकऱ्यांकडून चर्चा होत आहे. कारण कपिल शर्माच्या शोची निर्मिती सलमान खानने केली होती. या सर्व घटनांनंतर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि कॉमेडियन्सची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आणि या घटनांचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.